शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, दाम्पत्याविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 02:09 IST

मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक कार्यालयाची मोहर असलेले बुलावा पत्राबाबत रेल्वेचे कार्यालयात जाऊन खात्री केली. त्या वेळी ते बनावट असल्याचे स्पष्ट होताच तक्रारदारांनी रक्कम परत मागितली.

ठाणे - मुलीला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून समीर व उषा भिल्लारे (रा. खेवरा सर्कल) या दाम्पत्याने शहरातील नारळविक्रेते उमेश नाईक यांना चार लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नाईक यांच्या आरोपानुसार भिल्लारे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.पोखरण रोड येथे राहणारे नाईक यांचा लोकउपवन येथे हातगाडीवर नारळविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे गि-हाईक असलेले समीर भिल्लारे याने नाईकांना त्यांची पत्नी उषा ही भारतीय जनता पक्षाची मोठी कार्यकर्ती असून, तिची सरकारी आॅफिसमध्ये ओळख आहे. तिने अनेकांना रेल्वेत कामाला लावले आहे. ती तुमच्या मुलीलाही रेल्वेत कामाला लावेल, त्यासाठी तुम्हाला आठ ते दहा लाख रुपये रेल्वेच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतील, असे २०१८ मध्ये सांगितले. तर उषा हिने नोकरीस लावलेल्या मुलांच्या आॅर्डरच्या प्रती दाखवून अ‍ॅडव्हॉस म्हणून चार लाख मागितले. त्यानंतर उषा हिने २५ फेब्रुवारी २०१९ ला मुलीचे मेडिकल वांद्रे येथील रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये करायचे आहे. त्यासाठी आणखी दोन लाखांची व्यवस्था करा नाहीतर नोकरी जाईल, असे सांगितले. त्यानुसार दोन लाख दिल्यावर रेल्वे हॉस्पिटलमध्ये मेडिकल झाली. त्यानंतर फोनवरून विचारणा केल्यावर त्या दाम्पत्याने लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहिता चालू असून त्यात सरकारी नोकरीची कामे होत नाहीत, असे सांगितले. त्यानंतर नाईक यांनी मेरील एम यांचे नाव, मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक कार्यालयाची मोहर असलेले बुलावा पत्राबाबत रेल्वेचे कार्यालयात जाऊन खात्री केली. त्या वेळी ते बनावट असल्याचे स्पष्ट होताच रक्कम परत मागितली.या बाबत पोलीस उपायुक्तांकडे तक्रार अर्ज केल्यानंतर रावळ नावाच्या इसमाने दोन लाख रुपये परत केले. मात्र, भिल्लारे दाम्पत्याने चार लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, अद्यापही त्यांना अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी