शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ विकृताला अटक, नयानगर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 01:25 IST

मीरा रोडच्या नयानगर भागात अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. महेफूज मकसूद आलम शेख (२१) असे आरोपीचे नाव आहे.

मीरा रोड / भार्इंदर : मीरा रोडच्या नयानगर भागात अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. महेफूज मकसूद आलम शेख (२१) असे आरोपीचे नाव आहे.नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ एप्रिलला एक ११ वर्षांची मुलगी स्टेशनरीच्या दुकानातून वस्तू विकत घेऊन घरी परतत होती. त्यावेळी टोपी घालून आलेल्या शेखने तिच्याशी अश्लील प्रकार केला. या प्रकाराने घाबरून मुलगी घरी पळाली आणि घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर, त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तोच दुसºया दिवशी १५ एप्रिलला नयानगर भागातच रात्री ११ वा.च्या सुमारास एका २२ वर्षीय तरु णीला गाठून त्याने तसाच प्रकार केला होता. याप्रकरणीही नयानगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असता त्याचे छायाचित्र पोलिसांनी व्हायरल करत ओळख पटल्यास कळवण्याचे आवाहन उपनिरीक्षक सोहेल पठाण यांनी केले होते. परंतु, सलग दोन दिवस घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मीरा रोड, नवी मुंबई आदी भागांत रेहान कुरेशी या विकृताने विनयभंग, अत्याचार, हत्या आदी प्रकार केले असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्याकडे तपास सोपवला होता.पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजसह खबऱ्यांच्या आधारे विकृत शेखची ओळख पटली होती. परंतु, पोलीस त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा तो सापडला नाही. सलग दोन घटनांमुळे नयानगर परिसरात मोठी खळबळ उडून त्याचा फोटोही व्हायरल झाल्याने शेख हा लखनऊला नातेवाइकाकडे पळून गेला होता.शुक्रवारी तो लखनऊहून मीरा रोडला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. शेखला नयानगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनांनी परिसरात खळबळ उडाली होती.२०१७ मध्ये झाले होते लग्नशेखचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. परंतु, तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत तसेच विकृत असल्याचे लक्षात येताच त्याची पत्नी महिनाभरातच त्याला सोडून माहेरी गेली. असे यावेळी पोलिसांनी सांगितले. त्याने यापूर्वीही असे प्रकार केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी