शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Video : अखेर फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा बंगला जमीनदोस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 18:39 IST

अलिबाग येथील किहिम बीचनजीक असलेल्या नीरव मोदीचा बंगाल जमीनदोस्त करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे 

ठळक मुद्दे नीरव मोदीचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त का करत नाही, या बंगल्यावरील कारवाईवर 'ईडी'ला स्थगिती कशासाठी हवी आहे अशा शब्दांत कान उघाडणी करत हायकोर्टाने याप्रकरणी जाब विचारला.बॉलीवूडमधील सिनेस्टार तसेच मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांनी अलिबागकिनारी जमीन विकत घेऊन बेकायदा बंगले उभारले आहेत. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याही बंगल्याचा त्यामध्ये समावेश असून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून वर्सोली, सासवणे, कोलगाव, डोकवडे या गावांमध्

मुंबई - फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बंगल्याविरोधात कारवाई करण्यात येऊ नये यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हायकोर्टाकडे अर्ज केला होता. या अर्जाची दखल घेऊन हायकोर्टाने नुकतेच 'ईडी'ला चांगलेच फैलावर घेतले होते. नीरव मोदीचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त का करत नाही, या बंगल्यावरील कारवाईवर 'ईडी'ला स्थगिती कशासाठी हवी आहे अशा शब्दांत कान उघाडणी करत हायकोर्टाने याप्रकरणी जाब विचारला. तसेच यासंदर्भात महिनाभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अखेर आज रायगड कलेक्टरेटकडून दुपारी ३. ३० वाजल्यापासून बंगल्यावर कारवाई करण्यात आली. अलिबाग येथील किहिम बीचनजीक असलेल्या नीरव मोदीचा १०० कोटींचा बंगाला जमीनदोस्त करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे.

बॉलीवूडमधील सिनेस्टार तसेच मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांनी अलिबागकिनारी जमीन विकत घेऊन बेकायदा बंगले उभारले आहेत. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याही बंगल्याचा त्यामध्ये समावेश असून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून वर्सोली, सासवणे, कोलगाव, डोकवडे या गावांमध्ये सुमारे 160 बेकायदा बांधकामे उभारण्यात आली आहेत. बेकायदा बांधकामांविरोधात सुरेंद्र धावले यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली होती.

त्यावेळी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी कोर्टाला सांगितले की, नीरव मोदीच्या बंगल्याविरोधात यापूर्वीच कारवाईची नोटीस काढण्यात आली आहे, परंतु सीबीआयने या बंगल्याला सील ठोकले असून हा बंगला 'ईडी'ने चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. त्यावर हायकोर्टाने 'ईडी'ला ठणकावले. बंगला अनाधिकृत असतानाही 'ईडी'ला स्थगिती कशासाठी हवी आहे? या बेकायदा बंगल्यावर कारवाई करण्यास काय अडचण आहे? त्यावेळी 'ईडी'ने आपली बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, हा बंगला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयकडे 2 जानेवारीलाच परवानगी मागितली आहे.  परंतु अद्यापही त्याचे उत्तर मिळालेले नाही. अशी टोलवाटोलवीची उत्तरे हायकोर्टाच्या मिळत होती. रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी हा बंगला बेकायदेशीर ठरवत तो जमीनदोस्त करण्याचे काम सुरु केले आहे. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयcollectorजिल्हाधिकारी