शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फिल्मी स्टाइलने आरोपींना बेड्या; पोलिसांनी वेशांतर करून रचला सापळा, एक आरोपी निसटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2022 09:30 IST

प्लायवूड व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांपैकी चौघांना अटक.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील हिम्मत नाहर या प्लायवूड व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांपैकी चौघांना शहापूर येथील गोठेघर गावाच्या परिसरातून मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाइलने आठ तासांत गुरुवारी पहाटे अटक केली. नाहर यांची सुखरूप सुटका केली असून, ही कामगिरी बजावताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावातील लोकांप्रमाणे कपड्यांचा पेहराव करून वेशांतर केले होते.  

संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मदाज कांबळे, रोशन सावंत (सर्व रा. डोंबिवली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पूर्वेत नाहर यांचे डिलक्स प्लायवूड या नावाने दुकान आहे. ३ ऑगस्टला विश्वकर्मा हा त्यांच्या ओळखीचा व्यक्ती तेथे आला. त्याने प्लायवूडसंदर्भात काही व्यवहार केले. ॲडव्हान्सचे पैसे एटीएममधून काढून देतो, असे सांगून दुकानापासून काही अंतरावर नाहर यांना घेऊन गेला. तेथून नाहर यांना एका गाडीत कोंबले. या घटनेची माहिती  जितू यांनी  मानपाडा पोलिसांत तक्रार दिली. जितू यांना मुंबई आग्रा रोडवरील शहापूर येथील गोठेघर गावाजवळील एका बोगद्याच्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. जितू हे पैसे घेऊन गेले. पोलिसांची पथके ग्रामस्थांच्या वेशात गोठेघर परिसरात दबा धरून बसली होती. 

थोड्याच वेळात तेथे एका कारमधून तीन व्यक्ती आले. जितू याने आधी काकांना मला माझ्या ताब्यात द्या, असे सांगितले. तुमच्या काकाला जवळच असलेल्या खोलीत ठेवल्याची माहिती त्यांनी दिली.  त्याचवेळी पोलिसांनी स्वत:च्या गाड्या आडव्या टाकून कारला घेरले आणि तिघांना अटक केली. आरोपींना घेऊन घराची पाहणी केली असता तेथे आणखीन एक आरोपी आढळून आला, तर आरोपी इक्बाल शेख अंधाराचा फायदा घेत पळून गेला. 

 गुन्ह्यातील कार  घेतली होती भाड्याने गुन्ह्यात वापरलेली कार ही शिर्डी येथे जायचे आहे, हे सांगून एका ट्रॅव्हल्स कंपनीकडून रोकडे याने भाड्याने घेतली होती. ही कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 

टॅग्स :Policeपोलिस