शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट निर्माता हैदर काझमीला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 04:17 IST

तनुश्री दत्ता प्रकरण चर्चेत असतानाच, एका भोजपुरी मॉडेलने एका निर्मात्यावर बलात्काराचा आरोप करीत वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पेयातून नशेचे औषध देत चित्रपट निर्माता हैदर काझमी याने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.

मुंबई : तनुश्री दत्ता प्रकरण चर्चेत असतानाच, एका भोजपुरी मॉडेलने एका निर्मात्यावर बलात्काराचा आरोप करीत वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पेयातून नशेचे औषध देत चित्रपट निर्माता हैदर काझमी याने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी काझमीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.काझमी हा हिंदी चित्रपट ‘जिहाद’चा निर्माता आहे. काझमीने या मॉडेलसोबत चित्रपटाच्या सेटवर मैत्री करीत तिला लग्नाची मागणी घातली. मात्र तिने लग्नाला नकार दिला. तेव्हा त्याने बहीण अनिस काझमी हिची मदत घेत पीडितेला चहा पिण्यासाठी बोलावून घेतले. अनिस तिला काझमीकडे सोडून निघून गेली. याच दरम्यान पीडितेच्या शीतपेयामध्ये त्याने गुंगीचे औषध घालून तिच्यावर बलात्कार केला, असे तिने पोलिसांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ९ आॅक्टोबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी या गुन्ह्यात काझमीला पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर त्याची बहीण अनिस हिचा शोध सुरू आहे.काझमीवर करण्यात आलेले आरोप खोटे असून निव्वळ पैसे उकळण्यासाठी त्याला फसविले जात असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.भोजपुरी चित्रपटात ‘आयटम साँग’ करणाऱ्या मुलीला चित्रपटात काम करण्याची संधी काझमीने दिली आणि तिने त्याच्यावरच गुन्हा दाखल केला, असेही कुटुंबाने सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी दिली.

टॅग्स :Arrestअटक