शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आसिफ खान अपहरण प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 1:40 PM

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते आसिफ खान अपहरण प्रकरणानंतर त्यांचा मृतदेह शुक्रवारी पूर्णा नदीपात्रात आढळला याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी  आरापीविरू ध्द अपहरण, हत्या , कट करू न पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देपोलिसांनी आठ दिवस तपासणी मोहीम राबविल्यानंतर रोहणा या गावाजवळ आसिफ खान मुस्तफा खानचा मृतदेह आढळला. मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १२० ब, २०१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते आसिफ खान अपहरण प्रकरणानंतर त्यांचा मृतदेह शुक्रवारी पूर्णा नदीपात्रात आढळला याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी  आरापीविरू ध्द अपहरण, हत्या , कट करू न पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील सहाही आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांना २७ आॅगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान महिला व बालकल्याण सभापती ज्योती अनिल गणेशपुरे हिने वाडेगाव येथील रहिवासी आसिफ खान मुस्तफा खान यांना १६ आॅगस्ट रोजी तिच्या बहिणीचे घर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील आमला येरंडी या गावात बोलावले. त्या ठिकाणी आसिफ खानची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली. या हत्येसाठी ज्योती गणेशपुरे हिने तिचा मुलगा वैभव अनिल गणेशपुरे, स्वप्निल ऊर्फ गोलू वानखडे, वारीस शेख हुसेन, रामदास आत्माराम पखाले व अशोक श्रावण साबनकर यांचाही वापर केला. हत्या केल्यानंतर मृतदेह म्हैसांग परिसरात पूर्णा नदीपात्रात फेकण्यात आला. अकोला पोलिसांनी आठ दिवस तपासणी मोहीम राबविल्यानंतर रोहणा या गावाजवळ आसिफ खान मुस्तफा खानचा मृतदेह आढळला. दरम्यान, या प्रकरणात आरोपींनी आधीच हत्येची कबुली दिली होती; मात्र मृतदेह सापडत नसल्याने पोलिसांसमोरील अडचणी वाढल्या होत्या. शुक्रवारी मृतदेह आढळताच पोलिसांनी ओळख पटविली आणि सदर सहा जणांविरुद्ध मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १२० ब, २०१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांनी केली. मूर्तिजापूर ठाणेदारांची टोलवाटोलवी!मूर्तिजापूर शहरचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे या गंभीर प्रकरणातही टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचे दिसून येत आहेत. हायप्रोफाइल हत्याकांड असताना या हत्या प्रकरणाचे गांभीर्य ठाणेदारांना नसल्याची चर्चा पोलीस खात्यात जोरात सुरू आहे. डीएनए चाचणी होण्याची शक्यताआसिफ खान यांच्या मृतदेहाची ओळख पटलेली असली तरीही डीएनए चाचणी होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. आसिफ खान यांच्या पायावरील भरलेल्या जखमा व टी-शर्टवरून सदरचा मृतदेह त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले; मात्र कोणताही संशय नको म्हणून पोलीस डीएनए चाचणी करण्याच्या तयारीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखूनMurtijapurमुर्तिजापूर