शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दुकानासमोर टेम्पो उभा केल्याच्या कारणावरून मार्केटमध्ये व्यापाऱ्यात हाणामारी; एकजण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 17:19 IST

Fighting in Ulhasnagar Market : उल्हासनगर फर्निचर मार्केटमध्ये व्यापाऱ्यात बेदम मारामारी

ठळक मुद्देमारहाणीत अजय माखीजा गंभीर जखमी झाले असून त्यांना रात्री मुंबईला नेण्यात आले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सदानंद नाईकउल्हासनगर : फर्निचर मार्केटमध्ये दुकानासमोर टेम्पो उभा केल्याच्या कारणास्तव मंगळवारी सायंकाळी व्यापाऱ्यात हाणामारी झाली. मारहाणीत अजय माखीजा गंभीर जखमी झाले असून त्यांना रात्री मुंबईला नेण्यात आले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.उल्हासनगर कॅम्प नं-३ फर्निचर मार्केट मध्ये सायंकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान दुकानात आलेले साहित्य काढण्यात येत होते. यावेळी शेजारील व्यापारी दर्शनसिंग सरोज याने येऊन टेम्पोच्या चाकातील हवा काढली. दुकाना समोर टेम्पो उभा का केला? असा प्रश्न दुकानदार विजय माखीजा यांचा मित्र अजय याला दर्शनसिंग याने केला. तसेच रागाच्या भरात शिवीगाळ करून दोघांना मारहाण केली. काही वेळा नंतर सुरजितसिंग सरोज गुरुमुखसिंग सरोज, दर्शनसिंग सरोज, जगतारसिंग सरोज, फतेपालसिंग सरोज यांनी संगतमत करून लोखंडी रोडने विजय माखीजा व अजयच्या डोक्यात मारल्याने गंभीर जखमी झाले. मारहाणीत अजय गंभीर जखमी झाल्याने, मध्यरात्री त्यांना मुंबई येथे उपचारासाठी हलविल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्यापाऱ्यांतील मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

 मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दर्शनसिंग सरोज यांच्यासह जगतारसिंग सरोज, फतेपालसिंग सरोज, गुरुमुखसिंग सरोज सुरुजीतसिंग सरोज अश्या ५ जणांविरोधात मारहाण प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. टेम्पो दुकाना समोर उभा केला. याक्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली असुन शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजू उभ्या राहणाऱ्या गाड्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय सुरवाडकर पुढील तपास केला आहे.  

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसMarketबाजारMumbaiमुंबई