शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाचव्या संशयिताला अटक; महिलेला २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

By नारायण बडगुजर | Updated: August 29, 2024 21:00 IST

रविकांत याची मैत्रीण कविता गायकवाड हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तिच्या बोलण्यात तफावत आढळली.

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : मावळ तालुक्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी यापूर्वी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात गुरुवारी (दि. २९) आणखी एका महिलेला अटक करण्यात आली. तिला २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणात आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली.

कविता शैलेंद्र गायकवाड (३७, रा. अहमदनगर), असे गुरुवारी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (३७, रा. वराळे, तळेगाव दाभाडे), रविकांत भानुदास गायकवाड (४१, रा. अहमदनगर), डाॅ. अर्जून शिवाप्पा पोळ (६९, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) तसेच उषा निवृत्ती बुधवंत (३५, रा. कोपरखैरणे) यांना अटक केली आहे. समरीन निसार नेवरेकर (वय २५) आणि ईशांत (वय ५), इजान (वय २) अशी हत्या झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजेंद्र दगडखैर याने ६ जुलै रोजी समरीन नेवरेकर हिला गर्भपात करण्यासाठी मित्र रविकांत गायकवाड याच्यासोबत कळंबोली येथे पाठविले. दरम्यान, रुग्णालयात गर्भपात सुरू असताना समरीन हिचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी आपसात संगनमत करून ९ जुलै रोजी समरीनचा मृतदेह आणि तिच्या दोन्ही लहान मुलांना तळेगाव येथील वराळे येथे आणले. इंद्रायणी नदीत फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा ‘प्लॅन’ त्यांचा ठरला. त्यानुसार, इंद्रायणी नदीत समरीनचा मृतदेह फेकला. आईला फेकल्याचे पाहून दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. त्यामुळे नराधम संशयितांनी दोन्ही मुलांना देखील जिवंतपणे नदीत फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी गजेंद्र, रविकांत, तसेच गर्भपात करणारा डाॅक्टर अर्जून पोळ आणि गर्भपातासाठी मध्यस्थी करणारी महिला उषा बुधवंत यांना अटक केली. 

दरम्यान, रविकांत याची मैत्रीण कविता गायकवाड हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तिच्या बोलण्यात तफावत आढळली. तसेच पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हत्येच्या या कटात तिचा सहभाग असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी (दि. २९) तिला अटक करून न्यायालयात हजर केले. 

मृतदेह पुरले?

दरम्यान, पोलिसांनी समरीन आणि तिच्या मुलांचा मृतदेह शोधण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. पथकाने तळेगाव ते उजनी धरणापर्यंत इंद्रायणी नदीकाठच्या सर्व पोलिस ठाण्यांना मृतदेह शोधण्याबाबत माहिती दिली. मात्र, शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलवत संशयितांच्या अहमदनगर येथील मूळगावी शोध घेतला. शेतात आणि इतर काही ठिकाणी मृतदेह पुरले असण्याची शक्यता व्यक्त करत जेसीबीच्या साह्याने खोदून मृतदेहांचा शोध घेण्यात आला. मात्र, मृतदेह मिळून आले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी