शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ​​​​​​​महिला पोलीस अधिकारी अंघोळ करत होती; ड्रायव्हर व्हिडीओ काढून फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 08:45 IST

Crime news of Bhopal: महिला अधिकाऱ्याने एसपी मुख्यालयाशी संपर्क केला,  यानंतर शहरातील गुन्हे शाखेत हे प्रकरण हलविण्यात आले. आरोपी सध्या फरार असून त्याने गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. 

मध्य प्रदेशमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा (Women police officer) अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिडीओ बनविण्याच्या आरोप त्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या चालकावर लावण्यात आला आहे. आरोपी पोलीस कॉन्स्टेबल असून भोपाळ पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा ड्रायव्हर फरार झाला आहे. (female police officer bathing Video Recorded by Police constable.)

भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पोलीस कॉन्स्टेबलविरोधात कथितरित्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढणे आणि त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कॉन्स्टेबलचे नाव भूपेंद्र सिंह असे आहे. भूपेंद्र हा महिला पोलीस अधिकाऱ्याचा ड्रायव्हर होता. 

महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले की, अंघोळ करत असताना कोणीतरी व्हिडीओ बनवत असल्याचा भास झाला. २२ सप्टेंबरची ही घटना आहे. महिला अधिकाऱ्याने बाथरुमच्या दरवाजाच्या खाली एक मोबाईल कॅमेरा पाहिला. बाहेर येताच तेथून ड्रायव्हर फरार झाला होता.

महिला अधिकाऱ्याने सांगितले की, २६ सप्टेंबरला ड्रायव्हर तिच्या घरी आला आणि त्याने पाच लाख रुपयांची मागणी केली. असे न केल्यास सोशल मीडियावर तिचा बदनाम करण्याची धमकी दिली. महिला अधिकाऱ्याने एसपी मुख्यालयाशी संपर्क केला,  यानंतर शहरातील गुन्हे शाखेत हे प्रकरण हलविण्यात आले. आरोपी सध्या फरार असून त्याने गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश