शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
3
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
4
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
5
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
6
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
7
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
8
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
9
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
10
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
11
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
12
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
13
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
14
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
15
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
16
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
17
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
18
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
19
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
20
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

बेधडक कारवाई! अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडियासह तीन प्रतिष्ठानची तपासणी

By आशीष गावंडे | Updated: May 15, 2024 22:38 IST

नांदेड येथील कारवाईनंतर आयकर विभागाचा अकोल्याकडे मोर्चा

आशिष गावंडे, अकोला: आयकर विभागाने नांदेड येथे केलेल्या कारवाई नंतर त्यांचा मोर्चा अकोला शहराकडे वळविल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील आंगडिया सर्विस एजन्सीच्या कार्यालयासह इतर दाेन व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला. या छापेमारीमुळे शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. 

शहरातील जुना कापड बाजारात आंगडिया सर्विस एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांना कुरियर व इतर पार्सल सुविधा पुरविली जाते. बुधवारी सकाळी नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या एजन्सीच्या कार्यालयात छापा घातला. एजन्सी मार्फत होणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाण व इतर व्यवहारांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईत काही राेख रक्कम व नवरंग साेसायटीतील एका घरातून काही वस्तू आढळून आल्याचे बाेलल्या जात असले तरी त्याला अधिकृत दुजाेरा मिळू शकला नाही. यादरम्यान, सिंधी कॅम्पस्थित एका दाल मिल उद्याेजकाच्या घरी व याच उद्याेजकाच्या मालकीच्या असलेल्या एमआयडीसी व नवीन किराणा मार्केटमधील एका प्रतिष्ठानची झाडाझडती घेतल्याची माहिती आहे.

नांदेड प्रकरणाशी संबंध?

आयकर विभागाने १० मे राेजी नांदेड येथील एका फायनान्स कंपनी चालविणाऱ्या व्यावसायिकाच्या घरी व कार्यालयात छापेमारी केली असता, तीन दिवस चाललेल्या कारवाइत तब्बल १७० काेटी रुपयांचे घबाड समाेर आले. त्यानंतर लगेच अकाेल्यात आंगडिया सर्विस एजन्सीवर कारवाइ झाल्यामुळे या छापेमारीचा नांदेड प्रकरणाशी काही संबंध आहे का, याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. 

कागदपत्रे ताब्यात

आयकर विभागाने आंगडियाचे कार्यालय व दालमिल उद्याेजकाच्या प्रतिष्ठानमधून काही रजिस्टर, नाेंदवह्या आणि कागदपत्रे ताब्यात घेऊन साहित्याची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :raidधाडNandedनांदेडAkolaअकोलाIncome Taxइन्कम टॅक्स