शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराला गमाविण्याची मैत्रिणीकडे वर्तविली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 07:02 IST

Crime News: खार पोलिसांनी जान्हवीच्या मित्र-मैत्रिणीकडे अधिक चौकशी सुरू केली आहे. यात पार्टीत श्री याला आमंत्रणही नसल्याची माहिती समोर आली. त्याला जान्हवीचा प्रियकर म्हणून सहभागी करून घेण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जान्हवी कुकरेजा (१९) हिच्या हत्येच्या आरोपात अटकेत असलेल्या प्रियकर श्री जोगधनकर (२२) आणि दिया पडळकर (१९) यांच्याकडे पोलीस अधिक तपास करत आहेत. अशात, प्रियकर आणि मैत्रिणीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर, जान्हवीने मैत्रिणीला कॉल करून प्रियकराला गमाविण्याची भीती वर्तविली होती, तसेच ती फोनवर बोलत रडत असल्याचेही मित्रांंनी पाहिले असल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे. या प्रकरणी खार पोलीस नेमक्या घटनाक्रमाचा शोध घेत आहेत.

खार पोलिसांनी जान्हवीच्या मित्र-मैत्रिणीकडे अधिक चौकशी सुरू केली आहे. यात पार्टीत श्री याला आमंत्रणही नसल्याची माहिती समोर आली. त्याला जान्हवीचा प्रियकर म्हणून सहभागी करून घेण्यात आले. अशात पार्टीदरम्यान दियाला उलट्या झाल्याने तिला भगवती हाइट्स या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील यश आहुजा याच्या घरी नेले. त्यानंतर, ही सर्व मंडळी पुन्हा गच्चीत आली. थोड्या वेळाने श्री आणि दियाला जान्हवीने आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने ती अवस्थ झाली. 

तिने याबाबत मैत्रिणीला कॉल करून माहिती दिली. ती बराच वेळ फोनवर बोलताना रडत होती. तिला अन्य मित्र-मैत्रिणीने रडताना पाहिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. श्री आणि दियाचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीचे फुटेजही तपासण्यात येत आहे. अशात जान्हवीच्या हत्येनंतर दोघे जण पुन्हा पार्टीत सहभागी झाल्याचीही माहिती समजते. दरम्यान, पार्टीत ड्रग्जचे सेवन केले होते का? याबाबतही पथक चौकशी करत आहे. सध्यातरी घटनास्थळावरून असे कुठलेच पुरावे मिळालेले नाहीत.

नाइट कर्फ्युमुळे दिला होता नकारnजान्हवीची आई निधी कुकरेजा यांच्या म्हणण्यानुसार, जान्हवी एक हुशार मुलगी होती. बारावीतही तिने ९५ टक्के गुण मिळविले. त्यात दिया ही तिची बालपणीची मैत्रीण आहे. अशात श्रीही फक्त तिचा मित्र असल्याचेही त्यांनी नमूद केले. nवडिलांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दिया आणि श्रीने तिला सोबत येण्यास सांगितले. सुरुवातीला नाइट कर्फ्युमुळे तिने जाण्यास नकार दिला होता. मात्र, त्यांनी अवघ्या ३० मिनिटांत तिला घरी सोडतो, असे सांगून सोबत नेल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनNew Yearनववर्ष