शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 20:51 IST

संतप्त झालेल्या मोठया पीडित मुलीने याप्रकरणी २०१८ मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

जितेंद्र कालेकर

ठाणे- आपल्याच २८ वर्षीय विवाहित मुलीवर बलात्कार करुन दुसऱ्या अल्पवयीन मुलीची लैंगिक छळवणूक करणाऱ्या ५० वर्षीय पित्याला दुहेरी सश्रम कारावासाची तसेच दहा हजार रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश तसेच विशष पोस्को न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी शुक्रवारी सुनावली. ही शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने आपल्याला फाशीच द्यायची होती ना, असे म्हणत सरकारी वकीलांवर भर न्यायालयातच हल्ला केला.

यातील आरोपी पित्याला सहा मुली आहेत. तो नवी मुंबईतील रबाळे परिसरात वास्तव्याला होता. त्याची पत्नी गावी बिहारमध्ये असतांना त्याची मोठी मुलगी पतीच्या मारहाणीला कंटाळून माहेरी वास्तव्याला आली होती. त्यावेळी तिच्यावर त्याने एका रात्री बलात्कार केला होता. पुन्हा धमकी देत त्याने असाच प्रकार केल्याने यातून ती गरोदर राहिली होती. मात्र, तिने स्वत: गर्भपातही केला होता. परंतू, त्याने पुन्हा १४ वर्षीय अन्य अल्पवयीन मुलीवरही लैंगिक अत्याचाराचा प्रकार केला. 

संतप्त झालेल्या मोठया पीडित मुलीने याप्रकरणी २०१८ मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर तो पसार झाल्यामुळे पोलिसांनी त्याला बिहारमधून अटक केली होती. याच खटल्याची ३० डिसेंबर २०२२ रोजी ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी नऊ साक्षीदार तपासले. मुली आणि त्याची पत्नी यांनी आपला जबाब फिरविला. मात्र, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे त्याला न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दरम्यान, शुक्रवारी शिक्षा सुनावल्यानंतर ठाणे न्यालयातच ‘मला फाशीच द्यायची होती ना’ असे म्हणत सरकारी वकील हिवराळे यांच्यावर हल्ला केला. त्याने त्यांच्या उजव्या खांद्याला ठोसा मारला तितक्यात पोलिसांनी त्याला ओढले आणि कोर्टरुममधून बाहेर नेले. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात अ‍ॅड. हिवराळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी