शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला कलंक : विरारमध्ये सासऱ्याकडून २२ वर्षीय सुनेचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 00:43 IST

घरातील सर्व माणसे कामावर गेल्याची संधी साधून सास-याने मुलीसमान सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघड झाली.

वसई : सासरा - सुनेच्या नात्याला कलंक लागल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. घरातील सर्व माणसे कामावर गेल्याची संधी साधून सास-याने मुलीसमान सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघड झाली. सुनेच्या तक्रारीवरुन सास-याच्या विरोधात विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विरार पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लागलीच या वासनांध तसेच व्यवसायाने रिक्षा चालक असलेल्या आरोपीला गजाआड केले आहे.सास-याच्या या कृत्याबाबत पती, सासू, दीर यांना सांगूनही तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नसल्याने कंटाळून सुनेने प्रसंगावधान राखत सास-याची ही विकृती मोबाइलच्या कॅमे-यात कैद केली आणि अखेर ही धक्कादायक घटना घरच्या लोकांसमोर उघड केली.सविस्तर माहितीनुसार, आरोपी सासरा हा रिक्षाचालक असून तो पहाटे साडेतीनच्या सुमारास रिक्षा चालवायला जायचा. त्यानंतर पुन्हा सकाळी साडे आठ वाजता तो घरी यायचा. तो जेव्हा घरी येत होता, तेव्हा त्याची २२ वर्षीय सून घरी एकटीच असे.महिन्याभरापासून हा सासरा आपल्या सुनेकडेच वाकड्या नजरेने बघत होता. त्यातच अलीकडे सास-याने आपल्या सुनेला स्पर्श करुन तिच्याशी जवळीक साधत होता. पण ही विवाहिता त्या वासनांध सास-याला विरोध करत होती.शेवटी विरार पोलीस ठाण्यात सुनेने सास-याच्या विरोधात सर्व हकीकत तक्र ारीत नमूद केली. सुनेच्या तक्र ारीवरुन सास-याने विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी सास-याला बेड्या ठोकल्याचे विरारचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल दबडे यांनी सांगितले.अनेकदा सुनेने ही घटना सासू, पती आणि दीर यांना सांगितली. मात्र कुणाचाही यावर विश्वास बसला नाही. याउलट तिच्यावरच अविश्वास दाखवून तिला नांदायचे नसल्याने ती असे आरोप करीत असल्याचे तिला सांगत होते.यामुळे शेवटी सुनेनेच शक्कल लढवून हा प्रकार मोबाइलमध्ये कैद करून सास-याचा भांडाफोड करण्याचे ठरवले. आता या घटनेला वाचा फुटली असून विवाहीत तरुणीने आपल्या मोबाइल कॅमे-यात सास-याची विकृती कैद केल्यानंतर हा सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. त्याचवेळी पती-सासू, दीर यांनाही सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ