शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

आधी बिअर, नंतर 30 हजार रुपये मागितले; संतापलेल्या वडिलांनी मुलाची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 23:09 IST

वडील वृंदावन नामदेव यांनी पोलिसांना सांगितले की, हेमंत हा आम्हाला रोज मारहाण करत होता.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील हनुमानगंज पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळलेल्या वडिलांनी त्याची दोरीने गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी वडील वृंदावन नामदेव यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत असे मृत मुलाचे नाव असून तो मानसिक आजारी होता. त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले होते. यासाठी तो घरच्यांकडे पैसे मागत होता. पैसे न दिल्यास तो आई-वडिलांना मारहाण करत होता.

वडील वृंदावन नामदेव यांनी पोलिसांना सांगितले की, हेमंत हा आम्हाला रोज मारहाण करत होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याने पहिल्यांदा आमच्याकडे जबरदस्तीने बिअर मागितली. त्यानंतर आम्ही त्याला ती आणून दिली. यानंतर हेमंत 30 हजार रुपयांची मागणी करत होता. त्यावेळी त्याला आम्ही नकार दिल्याने त्याने आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, सतत भांडण करत असल्यामुळे त्याच्या वृत्तीला आम्ही कंटाळलो होतो, असे आरोपी वडिलांनी सांगितले

याचबरोबर, हेमंतने घरातील सर्व सामानही फोडले आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केल्याचे वृंदावन नामदेव यांनी पोलिसांना सांहितले. दरम्यान, वृंदावन नामदेव हे शिंपी आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील वृंदावन नामदेव यांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला मृत हेमंत हा त्याचे वडील वृंदावन नामदेव आणि कुटुंबासह बाल बिहार येथे राहत होता. तो मानसिक आजारी होता. त्याला ड्रग्जचेही व्यसन होते. त्यांचे वडील वृंदावन नामदेव कपडे शिवण्याचे काम करतात. हेमंतची आई दुर्गाबाई यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. तसेच, पोलिसांनी हेमंतचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे, असे पोलीस अधिकारी अवधेश सिंह भदौरिया यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश