शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सुनेची गोळ्या झाडून हत्या करणारा सासरा अखेर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 21:31 IST

सकाळी नाश्ता दिला नाही या रागातून सासऱ्याने सुनेवर गोळी झाडल्याची घटना गुरुवारी ठाण्याच्या राबोडीत समोर आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सकाळी नाश्ता दिला नाही या रागातून सासऱ्याने सुनेवर गोळी झाडल्याची घटना गुरुवारी ठाण्याच्या राबोडीत समोर आली होती. या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या सीमा पाटील (४२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर मारेकरी सासरा काशिनाथ पाटील (७४) हे घटनेनंतर पळून गेले होते. फरार सासऱ्याच्या माघारवर २ पोलीस पथक होती. मात्र शनिवारी संध्याकाळी आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

बांधकाम व्यावसायिक असलेले मारेकरी काशिनाथ पाटील यांना दोन मुले आहेत. हे कुटुंब एकत्र राहत असून काशिनाथ यांचे त्यांच्या पत्नीसह दोन्ही सुनांबरोबर वारंवार खटके उडत होते. त्यातच ते नातेवाईकांकडे सुनांची बदनामी करत, त्यातच गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काशिनाथ पाटील यांना नाश्ता मिळाला नाही. याच रागातून त्यांनी बंदूक काढून मोठा मुलगा राजेंद्र यांची पत्नी सीमा यांच्या पोटात गोळी झाडली.  जखमी झालेल्या सीमा यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.तेथे शस्त्रक्रिया ही करण्यात आली. मात्र गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून फरार झालेल्या काशिनाथ पाटील यांचा शोध सूरु होता.

दोन दिवस फरार आरोपीचा शोध पोलिस घेत होते. मात्र शनिवारी सायंकाळी आरोपी काशिनाथ हे स्वतः राबोडी पोलिस ठाण्यात हजर झाले, आणि ते पोलिसांना स्वाधीन झाले. पोलिसांनी काशिनाथ यांना अटक केली आहे. आपल्याकडून चुकीची घटना घडल्याचा त्यांना आता पश्चाताप झाला आहे. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या करण्याचा विचारही केला होता, अशी माहिती राबोडी पोलिसांनी दिली. मात्र शनिवारी ते स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती राबोडी, पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे