शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Crime News: जावयाकडून सासऱ्याचा विश्वासघात! ९७ लाखांना लुबाडले, दिव्यांग पत्नीलाही सोडून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 08:35 IST

मीरा राेडमधील कुटुंबाची फसगत. लग्नानंतर ताे महिन्यातील आठ दिवस मीरा रोडला सासरी राहायला असे.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : एका इंग्रजी वृत्तपत्रातील जाहिरात पाहून मुलीचे लग्न परराज्यातील व्यक्तीशी करणे मीरा रोडच्या शांतीनगरमधील एका मराठी कुटुंबाला वेदनादायी ठरले आहे. जावयाने ९७ लाखांना गंडा घालून दिव्यांग पत्नीला एकटेच सोडून पळ काढला आहे. नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अजय अग्रवाल नावाने विवाहासंबंधी जाहिरात आली हाेती. त्यात त्याने त्याचा अग्रवाल कन्स्ट्रक्शन नावाने व्यवसाय असून, कार्यालय नवी दिल्ली येथे, तर  कोलकाता येथील घराचा पत्ता दिला होता. स्थळ चांगले वाटल्याने या कुटुंबाने अजयशी संपर्क केला.  त्यानंतर ताे मीरा रोडला त्यांच्या घरी आला. मार्च २०१९ मध्ये घरीच लग्न केले. त्यानंतर अजयने त्याचे वडील मरण पावल्याचे व आईसोबत पटत नसल्याचे कारण सांगितले. 

२१ फेब्रुवारीला बोरीवली रेल्वे स्थानकावरून अजय हा भावाच्या साखरपुड्याला पत्नीला घेऊन दिल्लीला गेला. त्यासाठी पत्नीच्या अंगावर दागिने हवेत म्हणून सासरच्यांकडून दागिने घेतले. सासूला फोन करून तुमच्या मुलीला चालता येत नसल्याने साखरपुड्याला जायचे रद्द केल्याचे सांगून मुंबईला परतत असल्याचे कळवले. त्यानंतर त्याने दिल्लीहून तिला ट्रेनमध्ये बसवले.  सासूने अजयला तो न आल्याचे कारण विचारले. त्याने २६ फेब्रुवारीला येणार सांगून ताे परत आलाच नाही. 

अशी केली फसवणूकलग्नानंतर ताे महिन्यातील आठ दिवस मीरा रोडला सासरी राहायला असे. त्याने सासरच्या नावाने लखनऊ येथे पाच खोल्यांचा मोठा फ्लॅट घेऊ सांगितल्याने कुटुंबाने त्यांचा फ्लॅट विकून पैसे बँकेत ठेवले होते. फ्लॅट घेण्यासाठी त्याला धनादेश दिले असता, धनादेश चालत नसल्याचे सांगून रोख रक्कम देण्याची मागणी केली. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ८२ लाख रुपये बँकेतून काढून दिले. तसेच दिल्ली येथे त्याच्या भावाच्या साखरपुड्याला जायचे म्हणून पत्नीच्या अंगावर दागिने हवेत म्हणून सासरच्यांकडील हिऱ्यांची कर्णफुले, हातातील हिऱ्याच्या दोन अंगठ्या, एक सोन्याचे मंगळसूत्र, दोन पाटल्या आणि पत्नीकडील ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने स्वत:कडे ठेवून घेतले.

टॅग्स :fraudधोकेबाजी