शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"हे सगळं आत्म्याने केलंय, बदला पूर्ण झाला..."; मुलांची हत्या करून वडिलांचा गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 19:39 IST

या ३ मृतदेहांच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये मुलांचा मृत्यू गळा दाबून तर वडिलांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचं उघड झाले.

पीलीभीत - यूपीच्या पीलीभीत इथं मुलामुलीची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. मृतकाच्या खिशातून जेव्हा सुसाईड नोट सापडली तेव्हा पोलीसही हैराण झाले. हे सगळं आत्मानं केलंय, बदला पूर्ण झाला असं या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याने पोलिसांनाही धक्का बसला. सुसाईड नोटमध्ये जो काही उल्लेख केलाय ते ऐकून गावकऱ्यांची झोप उडाली आहे. 

या ३ मृतदेहांच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये मुलांचा मृत्यू गळा दाबून तर वडिलांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचं उघड झाले. मिळालेल्या माहितीनुसार, रंबोझा गावत बुधवारी सायकल दुकानदार बालकरामने स्वत:च्या पोटच्या मुलामुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर तिघांचे मृतदेह गावात आले. या तिघांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. 

बालकरामनं जी सुसाईड नोट लिहिली आहे ती वाचून गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बालकरामच्या खिशात ४ पानी सुसाईड नोट आढळली. ती वाचून कुणी बोलून ही नोट लिहून घेतलीय असं वाटत आहे. याबाबत पोलीस अधीक्षक दिनेश पी यांनी म्हटलंय की, या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असून सुसाईड नोट नेमकी कुणी लिहिली याचा शोध घेतला जात आहे. सुसाईड नोटमधील राइटिंग टेस्टिंगसाठी पाठवलं आहे. हे तंत्र-मंत्राचं प्रकरण वाटतंय. त्यामुळे सर्व अँगलने तपास केला जाईल असं पोलिसांनी म्हटलं. 

काय आहे प्रकरण? पीलीभीतमध्ये बालकराम नावाचा व्यक्ती सायकल दुरुस्तीचं काम करायचा. त्याला ११ वर्षीय मुलगा आणि १५ वर्षीय मुलगी होती. मुलामुलींचे मृतदेह बेडवर पडलेल्या अवस्थेत सापडले. तर बलकरामचा मृतदेह दुसऱ्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. बाजूच्या खोलीत असलेल्या १४ वर्षीय मुलाने हा सगळा प्रकार पाहिला त्याने कुटुंबातील अन्य सदस्यांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवले. अंधविश्वासामुळे व्यक्तीने आधी मुलांची हत्या केली त्यानंतर स्वत: गळफास घेतला.