शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बापाचा अल्पवयीन मुलीशी लैंगिक गैरवर्तनाचा प्रयत्न, माहिती लपवल्याने आजी, आत्यावरही गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 22:03 IST

Crime News : बापानेच अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २८ मे २०१९ पूर्वी राजापेठ ठाणे हद्दीत घडली.

अमरावती - बापानेच अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २८ मे २०१९ पूर्वी राजापेठ ठाणे हद्दीत घडली. मुलीने आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गैरवर्तनाबाबत पीडिताची आजी व आत्याला माहिती असतानाही त्यांनी ती दडवून ठेवली. कुठेही वाच्यता करू नको, अशी धमकीसुद्धा दिल्यामुळे  याप्रकरणी पीडितेची आजी व आत्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले. आरोपी पसार झाला आहे.पोलीससूत्रानुसार, ४२ वर्षीय बापाने १२ वर्षीय मुलीशी लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आईच्या तक्रारीवरून आरोपी वडील, पीडिताची आजी व आत्याविरुद्ध पोलिसांनी  मंगळवारी रात्री भादंविचे कलम ३७६(२), (फ), आय) (जे) ३७६ (अ, ब), २०२,५०६ ब, सहकलम ४,६,८,१२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला. पती-पत्नीचे पटत नसल्याने पत्नी माहेरी राहते, तर पती आई व बहिणीसोबत राहतो. घटनेच्या दिवशी मुलगी आजीकडे आली असता, आरोपीने तिचे कपडे काढून लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मुलीने ही माहिती तिच्या आईला सांगितली. त्यामुळे त्याचे बिंग फुटले. पीडितेच्या ६५ वर्षीय आजीला व ३५ वर्षीय आत्याला याची कल्पना असताना त्यांनी ही माहिती दडवून ठेवल्याने त्यांनाही प्रकरणात आरोपी करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती