शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पितापुत्र अटकेत, २२ कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 21:25 IST

Crime News - ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या कामगिरी

ठाणे : सीजीएसटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी पितापुत्राला मुंबई झोनच्या ठाणे सीजीएसटी विभागाने मुसक्या आवळल्या आहे. या प्रकरणी पितापुत्राला अटक करण्यात आली असून २२ कोटी रुपयांच्या जीएसटीच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

सेंट्रल इंटेलिजेंस युनिट, मुंबई सीजीएसटी झोन ​​यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे सीजीएसटी विभागाने कारवाई करत दोन व्यावसायिकांना अटक केली. अटक करण्यात आलेले दोघे हे नात्याने पितापुत्र आहेत. या दोघांच्या मेसर्स शाह एंटरप्रायझेस आणि मेसर्स यूएस एंटरप्रायझेस या दोन वेगळ्या फर्मचे ॲाफिस कांदिवली पश्चिम, मुंबई येथे आहे. दोन्ही कंपन्या फेरस वेस्ट आणि भंगार इत्यादींच्या व्यापारासाठी जीएसटी मध्ये नोंदणीकृत आहेत.११.८० आणि १०.२३ कोटी रु. ची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) अनुकमे घेउन आणि पास करण्यात गुंतल्या होत्या. सीजीएसटी कायदा २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा प्राप्त न करता बनावट आईटीसी बनावट संस्थांकडून मिळवत होत्या आणि ते या इतर नेटवर्कच्या संस्थांना देत होत्या. दोघांना सीजीएसटी कायदा २०१७ च्या कलम 69 अंतर्गत कलम 132(1)(b) &(c) चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली. तसेच त्यांना मंगळवारी मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लानेड, मुंबई यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती ठाणे सीजीएसटी विभागाकडून देण्यात आली.      

प्रामाणिक करदात्यांशी अस्वास्थ्य स्पर्धा निर्माण करणाऱ्या आणि सरकारी तिजोरीला योग्य कर न भरून फसवणूक करणाऱ्या बनावट ITC नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी CGST मुंबई झोनने ही कारवाई सुरू केली होती. येत्या काही दिवसांत विभाग फसवणूक करणाऱ्या आणि करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहे.  - राजन चौधरी, आयुक्त सीजीएसटी आणि उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालय

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागthaneठाणेcommissionerआयुक्त