शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा काय रे हे! बाप्पाच्या विसर्जनानंतर त्याच शेततळ्यात उडी घेत शेतकऱ्याने घेतला जगाचा निरोप

By चैतन्य जोशी | Updated: September 10, 2022 16:10 IST

अंबोडा येथील घटनेने खळबळ : देवळी पोलिसांनी घेतली नोंद     

वर्धा : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरुन अनेक उपाययोजना सुरु आहेत. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अशीच एक घटना देवळी तालुक्यातील अंबोडा गावात शुक्रवारी ९ रोजी घडली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्याने गणपती विसर्जनानंतर स्वत:ही जगाचा निरोप घेतला. या घटनेने अंबोडा गावात एकच खळबळ उडाली. 

गुणवंता अजाब मडावी (६०) रा. अंबोडा असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. गुणवंताकडे दोन एकर शेत आहे. मात्र, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे तो नेहमी विवंचनेत राहत होता. कर्जाची रक्कम फेडावी तरी कशी हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे गुणवंता त्रस्त होता. शुक्रवारी लहान भाऊ रमेश मडावी याच्याकडील गणपती विसर्जन असल्याने सर्व कुटुंबीय सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका शेतातील शेततळ्यावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. लगतच गुणवंताचे शेत असल्याने तो शेतात होता. बाप्पाला निरोप देऊन सर्व कुटुंबिय घरी परतले. मात्र, गुणवंताने बाप्पाच्या विसर्जनानंतर त्याच शेततळ्यात उडी घेत जगाचा निरोप घेतला.  शनिवारी १० रोजी सकाळच्या सुमारास गुणवंताचा मृतदेह तळ्याबाहेर काढण्यात आला. देवळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी घटनास्थळी जात पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. चार दिवसांपूर्वी दिली होती नोटीस मृतक गुणवंता याच्यावर गिरोली येथील स्टेट बॅंकेचे कृषी कर्ज होते. चार दिवसांपूर्वीच बॅंकेतील कर्मचारी गुणवंताच्या घरी आले होते. त्यांनी नोटीसही बजावली होती. तेव्हापासूनच गुणवंता विवंचनेत होता. त्याच विवंचनेतून त्याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले. आकस्मिक मृत्यूची नोंद गुणवंता मडावी याच्यावर कृषी कर्ज होते. याच विवंचनेतून त्याने आत्महत्या केली. ९ रोजी दुपारपासून मृतदेह तळ्याबाहेर काढण्याचे काम सुरु होते.  पोलीस अधीक्षक कार्यालयातील रेस्क्यू पथकही बोलाविण्यात आले होते. अखेर १० रोजी सकाळी गुणवंताचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

टॅग्स :Farmerशेतकरी