शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

प्रसिद्ध यू-ट्युबर 'बिनधास्त काव्या' रुसली, थेट इटारसीत जाऊन पोहचली, घडलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 08:47 IST

यू-ट्युबर ‘बिनधास्त काव्या’ तिच्या नटखट स्वभावामुळे सोशल मीडियावर परिचित आहे. लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांमध्येही तिचे रिल्स चांगलेच लोकप्रिय आहेत. 

औरंगाबाद : शहरातील प्रसिद्ध यू-ट्युबर ‘बिनधास्त काव्या’ ही अल्पवयीन युवती शुक्रवारी दुपारी दोन वाजेपासून बेपत्ता झाली होती. रागाच्या भरात निघून गेलेल्या काव्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) मदतीने काही तासांत शोधण्यात शहर पोलिसांना यश आले. खुशीनगर एक्स्प्रेसमधून तिला ताब्यात घेत मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले असून तिला शहरात आणले जात आहे.

छावणीचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हरिलाल यादव (३७, रा. पडेगाव) यांची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीत देवगिरी महाविद्यालयात शिकते. शुक्रवारी सकाळी तिला रागावल्याने दुपारी ती घरातून न सांगता निघून गेली.  तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार छावणी पोलिसांत वडिलांनी शुक्रवारी रात्री दिली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करत  पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पहाटे उशिरापर्यंत गणपती विसर्जन मिरवणुकीत व्यस्त यंत्रणेला वेळीच कामाला लावले. 

यू-ट्युबवर ५ मिलिअन फॉलोअर्सयू-ट्युबर ‘बिनधास्त काव्या’ तिच्या नटखट स्वभावामुळे सोशल मीडियावर परिचित आहे. लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांमध्येही तिचे रिल्स चांगलेच लोकप्रिय आहेत. तिचे यू-ट्युबवर साडेचार मिलियनपेक्षा जास्त, तर इन्स्टाग्रामवर १ मिलिअन फॉलोअर्स आहेत. याच चॅनलवरून तिच्या पालकांनी मुलीला शोधण्यासाठी मदतीचे आवाहन करत चार तासांचा व्हिडिओ केला. ती यूट्युबवर, खेड्यातील एक दिवस, चुलीवरचं जेवण, कॉलेजमधला पहिला दिवस किंवा पर्यटक म्हणून विविध शहरांमध्ये फिरताना, असे निरनिराळे व्हिडीओ अपलोड करत असते.