शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दिग्गजांना ‘साईड पोस्टिंग’, ‘फिल्डींग’वाल्या अधिकाऱ्यांना आयुक्तांचा ‘धक्का’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 18:54 IST

Police Officers Transfer : आयुक्तालयांतर्गत पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

ठळक मुद्देपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुक्रवारी रात्री उशिरा या बदल्यांचा आदेश काढला. ‘फिल्डींग’ लावून आलेल्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी यातून ‘धक्का’ दिला आहे.

पिंपरी : पोलीस आयुक्तालयातील बदल्यांना मुहूर्त मिळाला असून, नव्याने आलेले १३ तसेच जुने १७ पोलीस निरीक्षक अशा एकूण ३० अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बदल्या रखडल्या होत्या. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुक्रवारी रात्री उशिरा या बदल्यांचा आदेश काढला. ‘फिल्डींग’ लावून आलेल्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी यातून ‘धक्का’ दिला आहे.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन असून, मनुष्यबळाची कमतरता आहे. आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार चार सहायक पोलीस आयुक्त, १३ पोलीस निरीक्षक, चार सहायक निरीक्षक आणि १७ पोलीस उपनिरीक्षक नव्याने दाखल झाले. नव्याने आलेले अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. तसेच इच्छित ठिकाणी वर्णी लागावी म्हणून नव्याने आलेल्या काही अधिकाऱ्यांनी ‘जोर’ लावला होता. मात्र आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांची ‘वरिष्ठ’ म्हणून नियुक्ती केली नसल्याचे दिसून येते.‘ते’ पत्र भोवलेपोलीस आयुक्तालयातील हप्तेखोरीबाबत सोशल मीडियात पत्र व्हायरल झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर काही राजकीय पदािधकाऱ्यांनीही या हप्तेखोरीच्या चाैकशीची मागणी केली होती. त्यामुळे पत्रात नोमोल्लेख असलेल्या दिग्गज पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार, अशी चर्चा होती. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधित अधिकाऱ्यांचीही बदली केली.  बदली झालेले पोलीस निरीक्षक (कंसात सध्याची नेमणूक व नियुक्तीचे नवीन ठिकाण)भास्कर जाधव (नव्याने हजर ते दरोडा विरोधी पथक), उत्तम तांगडे (गुन्हे शाखा युनिट एक ते खंडणी विरोधी पथक), रामदास इंगवले (नव्याने हजर ते गुन्हे शाखा युनिट पाच), बालाजी सोनटक्के (म्हाळुंगे पोलीस चौकी ते गुन्हे शाखा युनिट एक), शिवाजी गवारे (भोसरी वाहतूक विभाग ते वरिष्ठ निरीक्षक, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे), बाळकृष्ण सावंत (गुन्हे शाखा युनिट पाच ते वरिष्ठ निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे), मोहन शिंदे (गुन्हे शाखा युनिट चार ते वरिष्ठ निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे), रवींद्र जाधव (वरिष्ठ निरीक्षक, चिंचवड पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), सुधाकर काटे (सायबर कक्ष ते वरिष्ठ निरीक्षक, चिंचवड पोलीस ठाणे), अरविंद पवार (नव्याने हजर ते म्हाळुंगे पोलीस चौकी), जितेंद्र कदम (नव्याने हजर ते निरीक्षक, गुन्हे, भोसरी पोलीस ठाणे), प्रदीप पाटील (नव्याने हजर ते निरीक्षक, गुन्हे, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे), विलास सोंडे (नव्याने हजर ते निरीक्षक, गुन्हे, निगडी पोलीस ठाणे), प्रकाश जाधव (आळंदी पोलीस ठाणे, गुन्हे ते दिघी पोलीस ठाणे, गुन्हे), संतोष पाटील (नव्याने हजर ते निरीक्षक, गुन्हे, वाकड पोलीस ठाणे), दिलीप भोसले (तळवडे वाहतूक विभाग ते निरीक्षक, गुन्हे, चिखली पोलीस ठाणे), सुनील गोडसे (नव्याने हजर ते चाकण वाहतूक विभाग), डॉ. संजय तुंगार (नव्याने हजर ते सायबर व तांत्रिक विश्लेषण शाखा), विठ्ठल कुबडे (चाकण वाहतूक विभाग ते सामाजिक सुरक्षा विभाग), ज्ञानेश्वर साबळे (नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ निरीक्षक, आळंदी पोलीस ठाणे), शिवाजी गवारे (भोसरी वाहतूक विभाग ते वरिष्ठ निरीक्षक, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे), राजेंद्र कुंटे (वरिष्ठ निरीक्षक, एमआयडीसी भोसरी ते पिंपरी वाहतूक विभाग), सतीश नांदुरकर (एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे (गुन्हे) ते सांगवी वाहतूक विभाग), बाळासाहेब तांबे (नव्याने हजर ते निगडी वाहतूक विभाग), सुधीर अस्पत (खंडणी/दरोडा विरोधी पथक ते भोसरी वाहतूक विभाग), वैभव शिंगारे (नव्याने हजर ते तळवडे वाहतूक विभाग), रवींद्र चौधर (वरिष्ठ निरीक्षक, आळंदी पोलीस ठाणे ते विशेष शाखा), अरुण ओंबासे (निगडी वाहतूक विभाग ते नियंत्रण कक्ष), प्रसाद गोकुळे (विशेष शाखा ते गुन्हे शाखा युनिट चार), विवेक लावंड (वरिष्ठ निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे ते कल्याण शाखा), राजेंद्रसिंग गौर (नव्याने हजर ते नियंत्रण कक्ष).

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTransferबदली