शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! मुलाच्या शाळेची फी भरण्यास पैसे नसल्याने कुटुंबाने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 14:08 IST

मुलाच्या शाळेची फी जमा करण्यास पैसे नसल्याने एका जोडप्याने आपल्या ११ वर्षीय मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चेन्नई  - खासगी शाळांचे पेव फुटल्याने गेल्या काही काळात शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मुलांच्या शाळेची फी आणि अन्य खर्च भागवताना अनेक कुटुंबे मेटाकुटीस येतात. दरम्यान, तामिळनाडूतील नागापट्टणम जिल्ह्यामधील वेलिपायम येथे मुलाच्या शाळेची फी जमा करण्यास पैसे नसल्याने एका जोडप्याने आपल्या ११ वर्षीय मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या जोडप्याने मुलाच्या शाळेची फी जमा करण्यासाठी पैसे उधार घेतले होते. मात्र हे पैसे परत करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी मुलासह आत्महत्या केली, असा दावा या जोडप्याच्या नातेवाईकांनी केला. मृताची ओळख सेंथिल कुमार अशी पटली आहे. पोलिसांनी सांगितले की, सेंथिल कुमार हा पेशाने सोनार होते. हा व्यवसाय हेच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होते. घटना घडली त्यावेळी सेंथिल कुमार यांच्या मित्राने त्यांना अनेकवेळा फोन केला. मात्र ते फोन उचलत नसल्याने या मित्राने त्यांच्या घराकडे धाव घेतली. घरी पोहोचल्यावर सेंथिल, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा मृतदेह त्यांना दिसला. त्यानंतर त्यांनी याची खबर पोलिसांना दिली. मुलाच्या शाळेची फी जमा करण्यासाठी सेंथिल यांनी अनेक ठिकाणाहून पैसे उधारीवर घेतले होते, असेही सेंथिल यांच्या मित्राने सांगितले.  मोठ्या प्रमाणावर झालेल्या उधारीची परतफेड करणे सेंथिल यांना अवघड झाले होते. त्यामुळे ते तणावाखाली होते. आता मुलाच्या शाळेची फी जमा करण्यासाठी त्यांना उधार पैसे मिळत नव्हते, असे सेंथिल यांच्या नातेवाईकाने सांगितले. सेंथिल यांचा मुलगा एका खासगी शाळेत इयत्त सहावीमध्ये शिकत होता. त्याचा मृतदेह त्याच्या शाळेच्या गणवेशामध्ये आढळला.  संपूर्ण कुटुंबाने विष मिसळलेले भोजन केले होते, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान, यासंदर्भातील शवविच्छेदन अहवाल येणे अद्याप बाकी आहे. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र सेंथिल कुमार यांच्या घरातून सुसाईड नोट मिळालेली नाही.  

टॅग्स :Suicideआत्महत्याTamilnaduतामिळनाडू