शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकऱ्यांच्या दबावामुळे सांगितली खोटी कहाणी," सिंघू बॉर्डरवर पकडलेल्या संशयिताची धक्कादायक कबुली

By बाळकृष्ण परब | Updated: January 23, 2021 15:50 IST

Farmer Protest : आज शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा करत एका संशयित व्यक्तीला आंदोलकांनी पकडून माध्यमांसमोर आणले होते.

नवी दिल्ली - कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू केलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. त्यातच शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात होत असलेल्या चर्चांमधून तोडगा निघत नसल्याने तिढा कायम आहे. त्यातच आज शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा करत एका संशयित व्यक्तीला आंदोलकांनी पकडून माध्यमांसमोर आणले होते. मात्र आता या संशयित व्यक्तीने पुन्हा एकदा आपला जबाब बदलला असून, आंदोलक शेतकऱ्यांच्या दबावामुळे आपण शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे विधान केले होते, अशी कबुली दिली आहे.आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकरी नेत्यांच्या हत्या करण्याचे कारस्थान रचल्याची कबुली योगेश नामक तरुणाने दिली होती. दरम्यान, आता आपला जबाब बदलताना योगेशने सांगितले की, काही लोकांनी मला पकडून कॅम्पमध्ये नेले. तिथे मारहाण केली. मला मारल्यानंतर खाऊपिऊ घातले. दारू पाजली. त्यानंतर त्यांनी माझा व्हिडीओ बनवला. माझ्यासोबत अजून चार जणांना पकडण्यात आले होते. यामधील एकाचे नाव सागर होते. इतरांची नावं मला माहिती नाही.योगेशने पुढे दावा केला की, त्या लोकांनी मला घाबरवले. आम्ही सागरला ठार केले आहे, असे सांगितले. आता तुला सुटायचे असेल तर आता आम्ही सांगू ते तुला प्रसारमाध्यमांसमोर सांगावे लागेल. तिथे एक खोटी कहाणी रचण्यात आली. ती मी प्रसारमाध्यमांसमोर सांगितली. त्या लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी हे सारे सांगितले. त्यानंतर मी पोलिसांसमोर गेल्यावर खरी परिस्थिती सांगितली.योगेश म्हणाला की, मी हरियाणामधील सोनीपत येथील रहिवासी आहे. योगेशने सांगितले की, १० तरुण अजून दिल्लीत येतील. एक तरुण सध्या शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. दरम्यान, आज सकाळी योगेशने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले होते की, शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे आदेश त्याला सोनिपतमधील राई पोलीस ठाण्याचे एसएचओ प्रदीप यांनी दिले होते. मात्र अधिक तपास केला असता राई पोलीस ठाण्यात प्रदीप नावाचा कुणी अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, २६ जानेवारी रोजी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याच्या उद्देशाने आपण आलो होते, असे योगेश यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण