शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या आत्महत्येचा बनाव; गळा आवळून खून केल्याचे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 18:45 IST

भंडारज खुर्द येथील घटना : मृतकाची पत्नी व पोलिसांची सतर्कता, याप्रकरणी पातूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला

अकाेला : तालुक्यातील भंडारज खुर्द येथे एका ३६ वर्षीय युवकाच्या आत्महत्येचा बनाव केला होता. परंतु, मृताची पत्नी व पोलिसांच्या सतर्कतेने बनाव उघडकीस आला असून, शवविच्छेदन अहवालात युवकाचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पातूर पोलिसांनी शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली.

पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द येथील मिलिंद तुळशीराम इंगळे (३६) यांनी बुधवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती माहेरी रिसोड येथे गेलेल्या त्यांच्या पत्नीला कळविण्यात आली. मृतकाची पत्नी परतल्यानंतर तिला संशय आला. त्यामुळे तिने पातूर पोलिसांना सोबत घेऊन गाव गाठले. मात्र, ती गावात पोहोचण्याच्या आधीच मृतावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंब व गावातील लोकांनी केली. परंतु, अंत्यसंस्काराच्या वेळेवर बुधवारी सायंकाळी मृताची पत्नी पोलिसांना घेऊन पोहोचल्याने अंत्यसंस्कार रोखण्यात आले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर मिलिंद इंगळे यांनी आत्महत्या केली नसून त्यांना मारहाण करून गळा आवळून खून केला व फासावर लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव केला, ही बाब स्पष्ट झाली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार किशोर शेळके, पोलिस उपनिरीक्षक मीरा सोनुने, गजानन मानकर, दिलीप इंगळे, संबोध इंगळे, सत्यजित ठाकूर, निलेश राठोड यांनी केली.

शेती आणि घराचा वादआरोपी संजय मोतीराम इंगळे (५२) व त्याची पत्नी ज्योती संजय इंगळे (४७) रा. भंडारज खुर्द यांना मृत मिलिंद इंगळे यांच्या कुटुंबाकडे असलेली एक एकर शेती हवी होती. ती मृताने देण्यास नकार दिला होता. तसेच मृतकाच्या पक्क्या घरात आरोपी कुटुंबासह राहत होता. ते घरही त्यांना हवे होते. मात्र, याच घरामध्ये मिलिंद इंगळे हा ७ ते ८ दिवसांआधी राहायला आला होता. याचा राग मनात धरून आरोपींन संगनमत करून  गळा आवळून खून केल्याचे आरोपींनी जबाबात सांगितले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत स्मशानभूमीत घेऊन गेले होते. मात्र, हा बनाव असफल ठरला.

खुनाचा गुन्हा दाखलआरोपीस खरी परिस्थिती माहिती असताना त्याने ३१ ऑगस्ट रोजी पोलिसांना खोटा जबाब दिल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर आता आरोपीविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपींना अटक केली.