शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगुलांकडून पैसे उकळणाऱ्या तोतया पोलिसांना अटक

By पूनम अपराज | Updated: April 8, 2019 23:35 IST

संदेश मालाडकर (44) आणि  सचिन खारवी (37) असे अटक आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देबदनामीच्या भीतीने हा प्रकार त्याने पोलिसांना सांगितला नाही. त्यांनी या पद्धतीने 9 ते 10 प्रेमी युगुलांना लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

मुंबई -  गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून प्रेमी युगूलांकडून पैशाची मागणी करणाऱ्या दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात मालाड पोलिसांना यश आलं आहे. आरोपी पीडित युगुलांना पळत ठेवून त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करायचा. संदेश मालाडकर (44) आणि  सचिन खारवी (37) असे अटक आरोपींची नावे आहेत.

यातील आरोपींपैकी मालाडकर हा नालासोपारा तर खारवी हा ठाण्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी एका फरार आरोपीची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून त्याचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींना याप्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी नुकतीच एका दुकानदाराला टार्गेट केले होते. दुकानदार त्याच्या प्रेयसीसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथून परतत असताना आरोपींनी त्याला रस्त्यात अडवले. आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असून महिलेसोबत काय करतोस? तुझ्या पत्नीचा मोबाईल क्रमांक दे, तिला माहिती देतो, असे धमकावले. तसेच 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी दुकानदाराने त्यांना 12 हजार रुपये दिले व उर्वरीत रक्कम नंतर देण्याचे आश्‍वासन दिले. त्यावेळी हा प्रकार हॉटेल मालकाला सांगितला. मात्र, बदनामीच्या भीतीने हा प्रकार त्याने पोलिसांना सांगितला नाही. त्यानंतर हॉटेल मालकाने या संशयीतांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. त्यावेळी रविवारी हॉटेलसमोर संशयित आल्यानंतर हॉटेल मालकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस पथकाने येऊन सापळा रचला व आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांनी या पद्धतीने 9 ते 10 प्रेमी युगुलांना लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसhotelहॉटेलCrime Newsगुन्हेगारी