शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी उकळणारा तोतया पोलीस जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:55 IST

खारेगाव टोलनाक्यावर एक टोळी मुंबई पोलिसाच्या मदतीने वाहनचालकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना मिळाली होती.

ठाणे : मुंबईच्या साकीनाका येथील कोरोना संशयित पोलिसाच्या मदतीने ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथे वाहनचालकांकडून खंडणी उकळणाऱ्या अमोल देवळेकर (४४, रा. भिवंडी, ठाणे) या तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून एका कारसह बनावट ओळखपत्र, पोलीस अधिकाºयाची टोपी, पाच हजारांची रोकड व मद्याच्या बाटल्यांचा बॉक्स असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.खारेगाव टोलनाक्यावर एक टोळी मुंबई पोलिसाच्या मदतीने वाहनचालकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी सापळा लावून कारवाईचे आदेश कळवा पोलिसांना दिले होते. त्यानुसार कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील घोसाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर आणि पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने ५ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून तोतया पोलीस अमोल याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याला अटक केली. मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाईही त्याच्याबरोबर सक्रीय होता, अशी माहिती त्याने दिली. दरम्यान, कोरोना संशयित पोलीस हवालदाराने या खंडणीसाठी मदत केल्याचे उघड झाल्याने या प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.मद्याची वाहने हेरायचेअमोल आणि कोरोना संशयित असलेला मुंबई वाहतूक शाखेचा पोलीस भिवंडीच्या मानकोलीतून मद्य घेऊन जाणाऱ्यांना हेरायचे.ठाणे व भिवंडीत जाणारी काही मद्याची वाहनेही ते अडवीत असत. त्यांच्याकडून पाच ते दहा हजारांपर्यंत खंडणी गोळा करून प्रकरण मिटवत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे