जळगावात बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 09:25 PM2021-01-04T21:25:36+5:302021-01-04T21:25:49+5:30

साडे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त

fake liquor factory demolished in Jalgaon State excise department takes action | जळगावात बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

जळगावात बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

googlenewsNext

जळगाव : एमआयडीसीला लागून असलेल्या मन्यारखेडा शिवारात पार्टेशनच्या घरात सुरु असलेला बनावट दारु निर्मितीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी दुपारी उद‌्वस्त केला. त्यात साडे तीन लाखाच्या दारुसह, स्पीरीट, मशिनरी व वाहने मिळून साडे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

गणेश भाऊराव कोळी (२४, रा.शिरपूर), सुखदेव पूनमचंद पवार (३०,रा.चिखली, ता.शहादा), गणेश हिरालाल सोनवणे (२८,रा.अयोध्या नगर), सियाराम हरीराम पावरा (१९,रा.शिव कॉलनी) व भाईदास शिवला पावरा (१८,रा.धरबापाडा,मोराडी, ता.शिरपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसीला लागूनच मन्यारखेडा शिवारात पत्री व पार्टेशनच्या घरात आठवडाभरापासून दारु निर्मिती केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सी.एच.पाटील यांना मिळाली होती. त्यानुसारअधीक्षक सीमा झावरे,बुलडाण्याचे निरीक्षक दीपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील,आनंद पाटील, सागर पाटील, सहायक फौजदार डी.बी.पाटील, जवान अजय गावंडे, कुणाल सोनवणे, नितीन पाटील, मुकेश पाटील, अमोल पाटील, राहूल सोनवणे व नंदू नन्नवरे यांच्या पथकाने दुपारी साध्या वेशात जावून कारखान्याला घेराव घातला. त्यामुळे एकालाही पलायन करण्यास संधी मिळाली नाही. दारु निर्मिती करतानाच पाचही जणांना ताब्यात घेतले. मशीन, दारु, स्पीरीट, बाटल्या व इतर साहित्यासह चारचाकी आणि दुचाकी ताब्यात घेतली.

Web Title: fake liquor factory demolished in Jalgaon State excise department takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.