शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश, भंगार व्यवसायिकाला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 19:18 IST

CGST Commissionerate busts fake input tax credit racket : अँटी इव्हेशन, सीजीएसटी, नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने फर्मची चौकशी केली.

नवी मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) आयुक्तालयाने मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी १०.२६ कोटीच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) रॅकेटचा पर्दाफाश केला. तसेच मेसर्स अल-मारवाह ट्रेडर्सच्या मालकास अटक केली. या फर्मचा ६० कोटीपेक्षा जास्त रकमेच्या बोगस पावत्याच्या जोरावर  बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा करून घेणे, त्याच्या वापर करण्यात सहभाग होता. त्यामुळे सरकारी तिजोरीत ६० कोटींची फसवणूक झाली.अँटी इव्हेशन, सीजीएसटी, नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने फर्मची चौकशी केली. मालकाच्या जबाबानुसार, ही फर्म फेरस, ऍल्युमिनियम, तांबे आणि इतर धातूंच्या भंगाराच्या व्यापाराशी संबंधित आहे. तथापि, तपासात असे उघड झाले आहे की, करदात्याने अस्तित्वात नसलेल्या/बोगस कंपन्यांकडून बनावट ITC प्राप्त करून मंजूर करून घेतला.आरोपीला केंद्रीय वस्तू व सेवा कायदा २०१७ च्या कलम ६९ (१) नुसार सदर कायद्याच्या कलम १३२ (१) (ब) आणि (क) अंतर्गत गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे आणि बेलापूर येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, अशी माहिती CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्कचे आयुक्त प्रभात कुमार यांनी सांगितले.हा कारवाईचा बडगा CGST, मुंबई झोनने फसवणूक करणारे आणि कर चुकवणार्‍यांविरुद्ध सुरू केलेल्या अँटी-इव्हेशन मोहिमेचा एक भाग आहे.  या मोहिमेचा एक भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने ४५० कोटींहून अधिक कर चुकवेगिरी उघडकीस आणली आहे. तसेच २० कोटी जप्त केले आणि नुकतेच 12 जणांना अटक केली.

आतापर्यंत ५० जणांना अटकनवी मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयने पाच महिन्यात आतापर्यंत ४५० कोटी रुपयांची करचोरी उघडकीस आणली असून २० कोटी रुपयांची वसुली केली आहे. आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे जीएसटीच्या मुंबई विभागाने या कालावधीत ६२५ करचोरी प्रकरणांचा तपास करून ५५०० कोटी रुपयांची करचोरी पकडली आहे. आणि ६३० कोटी रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ५० जणांना अटक केली आहे.

टॅग्स :GSTजीएसटीTaxकरArrestअटकcommissionerआयुक्तNavi Mumbaiनवी मुंबई