शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खरे सोन्याचे दागिने घेऊन दिले खोटे सोन्याचे बिस्कीट, रेल्वेच्या माजी अधिकाऱ्याची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 06:06 IST

दादरच्या भवानी शंकर रोड परिसरात राहत असलेले ७४ वर्षीय गोविंद अग्निहोत्री हे रेल्वेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

मुंबई : सोनसाखळी आणि अंगठीच्या बदल्यात सोन्याचे बिस्कीट देत असल्याचा बनाव करत, दोन ठगांनी दादरमधील एका सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याला लुटल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी दादर पोलिस तपास करत आहेत. दादरच्या भवानी शंकर रोड परिसरात राहत असलेले ७४ वर्षीय गोविंद अग्निहोत्री हे रेल्वेतून सेवानिवृत्त झाले आहेत. शनिवारी ते एका पोळी-भाजी केंद्रावर गेले होते. परतले तेव्हा इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन जण उभे होते. यातील एकाने हाक मारून अग्निहोत्री यांना बोलावले. या व्यक्तीकडे दोन सोन्याची बिस्किटे आहेत.

एक बिस्कीट मी घेतो आहे. त्या बदल्यात मी माझी सोनसाखळी आणि अंगठी त्याला देत आहे. तुम्हीही तुमच्या गळ्यातील सोनसाखळी आणि बोटातील अंगठी त्याला देऊन दुसरे बिस्कीट विकत घ्या, असे त्याने अग्निहोत्री यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अग्निहोत्री यांनीही त्यांची सोनसाखळी व बोटातील अंगठी असा एकूण १० ग्रॅम वजनाचा ऐवज काढून त्या व्यक्तीला देत, त्याच्याकडून सोन्याचे बिस्कीट घेतले. ती व्यक्ती तेथून निघून गेली. अग्निहोत्रीही आपल्या घरी परतले. दुपारी चारच्या सुमारास त्यांनी ते सोन्याचे बिस्कीट मुलाला दाखवत घडलेली घटना सांगितली. 

मुलाला सोन्याच्या त्या बिस्किटाबाबत संशय आला. त्याने वडिलांसोबत जवळच्या सराफाकडे जात ते बिस्कीट तपासण्यास सांगितले. सराफाने ते बिस्कीट तपासले असता, लोखंडाच्या बिस्किटावर तांब्याच्या पाण्याचा लेप देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र, आपली फसवणूक झाल्याची अग्निहोत्री यांची खात्री पटली. अखेर त्यांनी दादर पोलिस ठाणे गाठून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी