गुजरातमधील सूरतमध्ये बनावट डॉक्टरांविरोधात मोहीम राबवत असताना पोलिसांनी एका महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. हे लोक डॉक्टर असल्याचे दाखवून रुग्णांवर उपचार करत असल्याचा आरोप केला जात आहे. महिलेने १२ वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे, तर पुरुषाने १० वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. सध्या या दोघांकडून कोणत्याही प्रकारची डिग्री पोलिसांना मिळालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरतच्या उमरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी एका पुरुष आणि एका महिलेला अटक केली असून दोघेही डॉक्टर असल्याचं दाखवून लोकांवर उपचार करायचे. डीसीपी विजय सिंह गुर्जर यांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव प्रयाग रामचंद्र प्रसाद आहे, तर महिलेचे नाव ललिता कृपा शंकर सिंह आहे. महिलेचं बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे.
हे दोन्ही बनावट डॉक्टर लोकांवर ॲलोपॅथीची औषधे घेऊन उपचार करायचे. दोघांनी एक दवाखाना उघडला होता जिथे ॲलोपॅथीची औषधे मिळतात. पोलिसांनी दोघांकडे सर्टिफिकेट मागितलं असता त्यांच्याकडे कोणतेही सर्टिफिकेट मिळाले नाही. सूरतच्या उमरा पोलीस ठाण्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने दोघांनाही अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, आरोपी प्रयाग रामचंद्र प्रसाद याचं दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे. तर ललिता या महिलेने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. दोघेही डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते. दोघेही ॲलोपॅथीची औषधे देत असत. त्यांच्याकडून सापडलेली औषधं व इतर कागदपत्रं तपासली जात आहेत. हे लोक सूरतमध्ये किती वर्षे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते, हे सध्या तरी कळलेलं नाही.