शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

जिऱ्याच्या नावाखाली मोठी फसवणूक, ताटात काच अन् दगड; तब्बल 4198 किलो बनावट जिरं जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 14:28 IST

ऐन सणासुदीच्या दिवसात दिल्लीच्या कांझावालामध्ये बनावट जिऱ्याच्या एका कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. येथे बनावट जिरे बनवले जात होते.

तांदूळ-डाळ आणि बनावट कोबीनंतर आता भेसळयुक्त जिऱ्याचीही विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाजारातून जिरे विकत घेताना त्यात खडे असतील असा विचार केला जातो. पण तुम्हाला जर कोणी तुम्ही जिऱ्याच्या नावाखाली खडे खाताय असं सांगितलं तर सुरुवातीला धक्काच बसेल, विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात दिल्लीच्या कांझावालामध्ये बनावट जिऱ्याच्या एका कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. येथे बनावट जिरे बनवले जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या जिऱ्याच्या कारखान्यावर छापा टाकला तेव्हा तेथून तब्बल 4198 किलोहून अधिक बनावट जिरे जप्त करण्यात आले. तर 3000 किलोहून अधिक बनावट जिरे सापडले. या छाप्यात 43 वर्षीय कारखाना मालक सुरेश गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान भुसा, काच आणि दगडाच्या पावडरपासून हे जिरे बनवले जात असल्याचं आढळून आलं. 

बनावट जिरं आरोग्यासाठी घातक 

बनावट जिरं सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतं हे यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींवरुन स्पष्ट होतं. या कारखान्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये जमिनीवर पडलेले आणि गोण्यांमध्ये भरलेले बनावट जिरे दिसत आहेत. या जिऱ्याकडे पाहून ते बनावट असल्याचा अंदाज बांधणे जवळपास अशक्य आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

नकली ड्रायफ्रुट्स आणि भेसळयुक्त तेल

सध्या बाजारात बनावट खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. विशेषत: सण-उत्सवाच्या काळात बनावट खवा किंवा बनावट खव्यापासून बनवलेल्या मिठाईच्या बातम्या अनेकदा समोर येतात. अशातच कधी प्लॅस्टिकचा तांदूळ, नकली कोबीबाबतही बातम्या आल्या आहेत. याशिवाय, बनावट ड्रायफ्रुट्स, भेसळयुक्त तेलाची विक्री हे देखील चिंता वाढवणारं आहे. त्यामुळे वस्तुंची खरेदी करताना सतर्क राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी