शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
6
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
7
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
8
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
9
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
10
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
11
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
12
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
13
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
14
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
15
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
16
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
17
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
18
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
19
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
20
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

साडेनऊ लाख रुपयांची बनावट नाणी जप्त, दिल्ली पोलिसांची मुंबईत कारवाई; एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 12:41 IST

Crime News: बनावट नाणी तयार करून धार्मिक स्थळांवर त्यांचा वापर करणाऱ्या टोळीचा काळा धंदा दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबईत कारवाई करत मालाड येथून जिग्नेश गाला (४२) यास अटक केली.

मुंबई : बनावट नाणी तयार करून धार्मिक स्थळांवर त्यांचा वापर करणाऱ्या टोळीचा काळा धंदा दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबईत कारवाई करत मालाड येथून जिग्नेश गाला (४२) यास अटक केली. त्याच्याकडून एक, पाच आणि १० रुपयांची ९ लाख ४६ हजार रुपये किमतीची बनावट नाणीही  जप्त केली. 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, हरियाणामध्ये बनावट नाणी तयार करण्याचा कारखाना चालवला जात होता. त्यावर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून मुंबईत मोठ्या प्रमाणात बनावट नाणी पुरवली जात असून, त्यांचा वापर धार्मिक स्थळांवर केला जात असल्याचे समजले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुधवारी रात्री मुंबईत येऊन आमची मदत मागितली. त्यानुसार मालाड येथील वल्लभ बिल्डिंग ए-विंग सोसायटीमध्ये संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात नाणी जप्त केली, असे दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात यांनी सांगितले. मंदिरात सुटे पैसे देऊन त्या बदल्यात नोटा घेतल्या जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे असून  दिल्ली पोलिस चौकशी करत आहेत.

स्थानिक दुकानदार मंदिरात येणाऱ्या सुट्या पैशांच्या बदल्यात आम्हाला नोटा देतात. मात्र, चिल्लर देऊन नोटांची विचारणा अद्याप आमच्याकडे करण्यात आली नव्हती. बनावट नाण्यांचा प्रकारही पहिल्यांदा ऐकिवात आला. आम्ही भविष्यात याबाबत काळजी घेऊ.-हेमंत जाधव, प्रबंधक, मुंबादेवी मंदिर.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी