शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धाड टाकण्यास गेलेल्या बनावट सीबीआय अधिकाऱ्याला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:10 IST

केंद्रीय गुप्तचर खात्याचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या घरावर दोन खºया कॉन्स्टेबल्सच्या मदतीने छापा मारणाºयाचे बिंग फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : केंद्रीय गुप्तचर खात्याचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या घरावर दोन खºया कॉन्स्टेबल्सच्या मदतीने छापा मारणाºयाचे बिंग फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अभिनेता अक्षय कुमारची भूमिका असलेल्या ‘स्पेशल छब्बीस’ या हिंदी चित्रपटाची या निमित्ताने आठवण आली.मुजफ्फरनगरमध्ये व्यावसायिक आदेश गोयल यांच्याकडे हा बनावट सीबीआय अधिकारी काही दिवस कामाला होता. या भामट्याने दाढी ठेवली होती तरी गोयल यांनी त्याला ओळखले. त्याला नंतर अटक करण्यात येऊन त्याच्याकडील सीबीआयची कागदपत्रे, बनावट ओळखपत्र व इतर दस्तावेज जप्त करण्यात आले.हा आरोपी शनिवारी रात्री ८ वाजता मंडी पोलीस ठाण्यात आला. त्याने सीबीआयचे ओळखपत्र आणि व्यावसायिकाच्या घरी टाकायच्या छाप्याचा आदेश (सर्च वॉरंट) दाखवला. गोयल यांची उत्तराखंडमध्ये तांदळाची गिरणी आहे. हा भामटा दोन पोलीस कॉन्स्टेबल्सच्या मदतीने गोयल यांच्या घरी छाप्याची कारवाई करीत असताना गोयल यांचे अनेक शेजारी जमले व त्यांनी सीबीआय अधिकाºयाच्या संशयास्पद वर्तनाला आक्षेपही घेतला. या भामट्याचा आवाज कोणी तरी ओळखला आणि त्याची दाढी खेचताच ती निघाली व परिस्थिती चिघळली. बनावट अधिकाºयाचे नाव त्रिविंदर कुमार (रा. मुजफ्फरनगर) आहे. त्रिविंदर कुमार याच्यावर भारतीय दंडसंहितेचे कलम ४२० व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी