शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील बनावट कॉल सेंटरचा म्होरक्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 03:22 IST

दिल्लीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणात कफपरेड पोलिसांनी मुख्य सूत्रधार शशांक दुबेसह तिघांना शनिवारी अटक केली. त्यामुळे आरोपींचा आकडा ६ वर गेला आहे.

मुंबई : दिल्लीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणात कफपरेड पोलिसांनी मुख्य सूत्रधार शशांक दुबेसह तिघांना शनिवारी अटक केली. त्यामुळे आरोपींचा आकडा ६ वर गेला आहे. त्यांच्याकडून तब्बल १६ लॅपटॉपसह १६ मोबाइल फोन, ४ हार्ड डिस्क, १९ सिम कार्ड, वायफाय किट जप्त करण्यात आले आहे.एचडीएफसी बँकेमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने सव्वा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये तक्रार दिली. त्याच तक्रारीच्या आधारे कफपरेड पोलिसांनी तपास सुरूकेला.बँक खात्याच्या आधारे तपास सुरू करीत पंजाब अ‍ॅण्ड नॅशनल बँकेतील खातेधारक देवरुषी शर्मा (२४) याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीतून टोळीसाठी बँक खाती उपलब्ध करून देणारा विक्रांत गिरी (२५) याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर जयदीप शास्त्री जाळ्यात अडकला.विक्रांतच्या चौकशीतून या टोळीचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी कॉल सेंटर चालविणारा टोळीचा मुख्य सूत्रधार शशांक दुबे (२८) याच्यासह त्याला बेरोजगार तरुण-तरुणींची माहिती पुरविणाऱ्या मॉन्स्टर डॉट कॉम कंपनीतील कर्मचारी सोनल राणा (३५) आणि शाईन डॉट कॉम कंपनीतील कर्मचारी मनोज तिवारी (३२) यांना अटक केली. गेल्या ४ वर्षांपासून ही टोळी तरुण - तरुणींची फसवणूक करीत होती. अशा प्रकारे या टोळीने मुंबईसह संपूर्ण देशभरातील सुमारे १०० जणांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी