शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाखांची खंडणी; महिला वकील अटकेत; वाशी पाेलिसांकडून फरार आराेपीचा शाेध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 09:37 IST

हॉटेल व्यावसायिक किशोर रत्नाकर शेट्टी आणि त्यांच्या भागीदारीत चालणाऱ्या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार संबंधित महिला वकिलाने केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: हॉटेल व्यावसायिकांकडून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि तडजोडीनंतर १२ लाख स्वीकारताना  एका महिला वकिलास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. तिचा एक साथीदार फरार असून, वाशी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हॉटेल व्यावसायिक किशोर रत्नाकर शेट्टी आणि त्यांच्या भागीदारीत चालणाऱ्या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार संबंधित महिला वकिलाने केली होती. यानंतर किशोर शेट्टी आणि संबंधित इतर व्यावसायिकांनी १३ मे रोजी वाशी सेक्टर ३० येथील तुंगा हॉटेलमध्ये तिची भेट घेतली. तुम्ही सर्व जण बेकायदेशीररीत्या हॉटेल चालवीत आहात, अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यावरील कारवाईसाठी मी यापूर्वीच महापालिका आणि मंत्रालयात तक्रार केली आहे. कारवाई टाळायची असेल, तर २० लाख रुपये द्यावे लागतील, असे तिने या व्यावसायिकांना सांगितले. 

हॉटेलमध्ये घेतली भेट

  • शेट्टी व इतर व्यावसायिकांनी आरोपीच्या सांगण्यावरून पुन्हा २२ मे रोजी याच हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यावेळी खंडणीच्या रकमेत तडजोड करून ती १२ लाखांवर मान्य करण्यात आली. 

  • याप्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे  पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार पोलिस सहआयुक्त संजय येनपुरे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक नीलम पवार यांच्या पथकाने सापळा रचला.  

  • हॉटेलमध्ये खंडणीस्वरूपात १० हजारांचे खरे चलन आणि ११ लाख ९० हजार रुपयांचे बनावट चलन, अशी बारा लाखांची रक्कम स्वीकारताना  तिला अटक झाली. या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईArrestअटक