शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पैठणमध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:04 IST

घटनास्थळी एक मोबाईल आणि सुसाईड नोट आढळून आली असून पोलीस तपास सुरू आहे

ठळक मुद्देधरणाच्या दगडी पिचिंगवर खाद्यपदार्थ आणि चप्पल बूट आढळले आहेत दोघांची ओळख अद्याप पटली नाही

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण तालुक्यात सातत्याने दुर्घटना घडून बळी जात असल्याने पैठण तालुका हादरला आहे. दरम्यान धरणात आढळून आलेले मृतदेह पतीपत्नी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रूग्णालयात हलविले आहेत.

येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयात   धरण नियंत्रण कक्षा पासून काही  अंतरावर  शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास  एक पुरुष व एक महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या पाहणी नंतर  ते पती पत्नी  असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. या दाम्पत्याने  धरणात आत्महत्या केली असल्याची शक्यता व्यक्त  होत आहे. मृत देहाजवळ एक मोबाईल व त्यात एक लिहलेली चिठ्ठी  सापडली असून यावरुन  दोघे पती पत्नी असावेत असा अंदाज  पोलिसांनी सुद्धा वर्तविला आहे.

घटनेची माहिती जायकवाडी धरण नियंत्रण कक्षातील तांत्रिक सहायक गणेश खराडकर यांनी पैठण पोलिस ठाण्यात  दिल्यानंतर तातडीने   पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर ओव्हळ, मनोज वैद्य, राजू शेख, राजू आटोळे, चव्हाण, नाईक, सविता सोनार आदींनी जलाशयातून मृतदेह बाहेर काढून पैठण येथील शासकीय रूग्णालयात हलवला. घटनास्थळी आत्महत्ये पूर्वी धरणाच्या दगडी पिचिंगवर बुट, चप्पल व पाण्याची बाटली खाद्यपदार्थ इत्यादी साहित्य आढळून आले आहे. दरम्यान, हे दोघे कोण आहेत, त्यांनी आत्महत्या का केली, प्रकार नेमका काय आहे ? हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू