शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तस्करांवर उत्पादन शुल्क करणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 04:09 IST

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या थर्टीफर्स्ट आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर, उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. गुजरातमार्गे नेहमीच मोठ्या प्रमाणात कर चुकवून येणाऱ्या दारू तस्करांसह बनावट दारू राज्यात येऊ नये म्हणून राज्याच्या हद्दीवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या थर्टीफर्स्ट आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर, उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. गुजरातमार्गे नेहमीच मोठ्या प्रमाणात कर चुकवून येणाऱ्या दारू तस्करांसह बनावट दारू राज्यात येऊ नये म्हणून राज्याच्या हद्दीवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.नाताळ आणि थर्टीफर्स्ट जोरदार साजरा केला जातो. त्यासाठी हॉटेल्स, क्लबनी केव्हाच तयारी सुरू केली आहे. या दिवसांमध्ये दारूचा खप सर्वाधिक होतो. विविध मोठमोठ्या पार्ट्यांसाठी दारू ठेवण्यात येते. आयोजक या पार्ट्यांमधून जास्तीत जास्त फायदा मिळावा यादृष्टीने पाहत असतो. मात्र राज्यात दारूवर जास्त प्रमाणात कर आकारण्यात येत असल्याने त्यामानाने गुजरातमध्ये दारूवर कमी कर आकारला जात असल्याने आयोजक गुजरातमधून स्वस्त दारू आणण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक जण गुजरात मार्गे वाहनांमधून कर चुकवून राज्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी करून राज्याचा मोठ्या प्रमाणात कर बुडवितात.अशा पद्धतीने कर बुडविणाºयांवर चाप बसविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी आणि विभागीय उपआयुक्त टी. आर. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके नेमण्यात आली आहेत. त्यात मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर विभागांतील निरीक्षकांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांची दापचारी, तलासरी, उधवा, झाई, आमगाव इत्यादी गुजरात दिशेने राज्यात येणाºया रस्त्यांवर चक्राकार पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून ३१ जानेवारीपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कळविण्यात आले आहे.तसेच राज्यात अनेक महामार्ग जात असून या महामार्गावरील हॉटेल्स, धाब्यांवर दीव व दमण व इतर कंपनीच्या बनावट दारूची विक्री केली जाते. अनेक वेळा उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून कंटेनरसारख्या वाहनातून कर चुकवून आणलेले मद्य, बनावट दारू पकडली आहे. थर्टीफर्स्ट आणि नाताळ या काळात अशी कर चुकवून आणलेली दारू सर्रासपणे विक्री केली जाते. त्यामुळे बेकायदा मद्याची आवक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने संपूर्ण गुजरात मार्गावर तपासणी सुरू केली आहे.१ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंतची कारवाईया पथकांना गुजरात मार्गे कर चुकवून तस्करांनी आतापर्यंत आणलेली १७ लाखांची अवैध दारू पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून २५ वाहने जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Smugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारी