शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नकली नोटांची अदलाबदली, वाडा पोलिसांनी सापळा रचून तिघांना केली अटक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:38 IST

सापळा रचून रविवारी दुपारच्या सुमारास तीन आरोपींना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाडा : तालुक्यातील पाली गावच्या हद्दीत काही जण भारतीय चलनातील खऱ्या नोटा व तशाच नकली नोटा एकत्रित करून त्या चलनात आणण्यासाठी व अदलाबदल करण्यासाठी एकत्र येणार असल्याची माहिती वाडा पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून रविवारी दुपारच्या सुमारास तीन आरोपींना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १४ लाख रुपयांच्या नकली नोटा आढळल्या.

विकास ऊर्फ विकी पवार (वय ३२), इम्तियाज शेख (५६), वसीम सय्यद (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पाली गावच्या हद्दीत काही जण नकली नोटा अदलाबदलीसाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी दोन पंचांना बोलावले. पोलिस व पंच असे वेश पालटून पाली नाका येथे रविवारी दबा धरून बसले असता जिल्हा परिषद शाळा पालीच्या मेन गेटजवळ एकजण काळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याच्यावर पाळत ठेवून पोलिस दबा धरून बसले होते. दुपारी ३:४५च्या सुमारास विक्रमगड बाजूकडून कार शाळेच्या गेटजवळ येऊन थांबली. त्या कारमधून दोघे उतरले व त्या व्यक्तीशी चर्चा करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अशा प्रकारच्या नकली नोटांमुळे खळबळ उडाली आहे.

नोटांचे बंडलया तिघांकडे ५०० रुपयांच्या १६०० नोटा तसेच १०० रुपयांच्या ५७३० एवढ्या नोटांचे बंडल आढळून आले.  काळ्या रंगाचे पुठ्ठ्यांचे बंडल,चिकटपट्ट्या असा मुद्देमाल मिळून १४ लाख किमतीच्या नकली नोटा मिळून आल्या. ते नोटा अदलाबदलीसाठी वापरणार होते. 

यांनी केली कारवाईही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर मालकर, मयुरेश अंबाजी, मयूर शेवाळे, पोलिस हवालदार गुरुनाथ गोतारणे, विजय मढवी, मनोज चौधरी, गजानन जाधव, भूषण खिल्लारे, संतोष वाकचौरे यांच्या पथकाने केली. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी