शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गांजा विकणारा भाजपचा माजी पदाधिकारी मुलीसह अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 10:05 IST

मीरा रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवानंद देवकर हे त्यांच्या पथकासह गस्त घालत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : गांजा विक्री प्रकरणात मीरा-भाईंदर भाजपचा माजी पदाधिकारी निहाल एजाज खान (३६, रा. मुन्शी कंपाउंड, काशिमीरा) याला व त्याच्या सावत्र मुलीला अटक करण्यात आली. या दोघांना ८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, तो गाडीतून फिरत गांजा विकत असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

मीरा रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवानंद देवकर हे त्यांच्या पथकासह गस्त घालत होते. त्यावेळी शिवार उद्यान येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळेच्या मार्गावर ३ मे च्या रात्री सातच्या सुमारास निहाल हा एका गाडीच्या आडोशाला संशयास्पदरीत्या हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उभा असल्याचा पोलिसांना दिसून आला. देवकर यांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याच्या गाडीत बसलेली तरुणी पळून गेली. पोलिसांनी झडती घेतली असता प्लास्टिक पिशव्यांमध्ये विक्रीसाठी भरलेला ८०० ग्रॅम गांजा, तर दुसऱ्या पिशवीत ७६५ ग्रॅम गांजा आढळला.

शिवाय दोन मोबाइल, वजन काटा, ४ हजार ३०० रोख, प्लास्टिक पिशव्या असा एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल आढळला. तपासादरम्यान गाडीतून पळालेल्या सपना ऊर्फ शायदा सियासत खान (२६) हिला देखील अटक केली. निहाल हा भाजपचा माजी युवा जिल्हा सचिव असून, सपना ही त्याची सावत्र मुलगी आहे. तिच्यावर याआधीही अमलीपदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष सांगवीकर करत आहेत.