शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

ना बँक डिटेल्स दिले, ना लिंक क्लिक केली तरी गेले दोन लाख; नेमके काय घडले?  

By गौरी टेंबकर | Updated: February 22, 2023 07:01 IST

ॲप रिफंडच्या नावे निवृत्त बँक अधिकाऱ्याची फसवणूक, ज्याचे पैसे ते ऑनलाइन भरतात. त्यांनी गाना ॲप इंस्टॉल करत वर्षभराचे पेड सबस्क्रिप्शन घेतले आहे. 

मुंबई : ॲपमधील रिफंड क्रेडिट करायचा असल्याचे सांगत एका निवृत्त बँक अधिकाऱ्याचे क्रेडिट कार्डवरून जवळपास सव्वा दोन लाख रुपयांची खरेदी करत फसवणूक करण्यात आली. मुख्य म्हणजे संबंधित बँक अधिकाऱ्याने ना डिटेल्स शेअर केले, ना कोणत्या लिंकवर क्लिक केले. या फसवणुकीची त्यांनी एमएचबी कॉलनी पोलिसांत तक्रार दिली असून तपास सुरू आहे.

प्रेमानंद शिरोडकर (वय ७०) बोरिवली पश्चिम परिसरात पत्नी ममता (७०) यांच्यासोबत राहतात. शिरोडकर हे रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड, फोर्ट येथून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा एक मुलगा परदेशात आयटी क्षेत्रात, तर दुसरा मुंबईतच आंतरराष्ट्रीय बँकेत काम करतो. शिरोडकर यांचे सारस्वत आणि पंजाब नॅशनल बँकमध्ये खाते असून ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरतात. ज्याचे पैसे ते ऑनलाइन भरतात. त्यांनी गाना ॲप इंस्टॉल करत वर्षभराचे पेड सबस्क्रिप्शन घेतले आहे. 

नेमके काय घडले?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबरला सकाळी त्यांना दोन अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आले. तुम्ही गाना ॲप इन्स्टॉल केल्याने रिफंड प्राप्त झाले असून ते आम्हाला क्रेडिट करायचे आहेत. त्यासाठी क्रेडिट कार्डची माहिती द्या, असे सांगितले. मात्र, शिरोडकर यांनी माहिती दिली नाही. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर लिंक आली. मात्र, त्यांनी उघडली नाही. त्यानंतर त्यांचा फोन हँग झाल्याने त्यांनी रिस्टार्ट केला. मात्र, मोबाईलची बॅटरी संपल्याने त्यांनी चार्जिंगला लावला. फोन चालू केला त्यावेळी क्रेडिट कार्डद्वारे ॲमेझॉन पेवर जवळपास ११ विविध व्यवहारांत २ लाख ३६ हजार ११० रुपये काढण्यात आले. शिरोडकर यांनी कस्टमर केअरला संपर्क करत कार्ड ब्लॉक केले. त्यांनी एसबीआय कार्ड नोडल अधिकाऱ्यांनाही ई-मेल पाठविला.

बँकेकडून पैसे रिफंड मिळणार नाहीबँकेने शिरोडकर यांना २५ हजार रुपये अतिरिक्त क्रेडिट दिल्याचे सांगितले. तेव्हा मला न विचारता क्रेडिट लिमिट का वाढवले, असे विचारल्यावर मॅनेजरने त्यांच्यावर क्रेडिट कार्ड, सीव्हीव्ही आणि ओटीपी शेअर केल्याचा आरोप केला. फसवणूक झालेली रक्कम परत करता येणार नाही, असेही सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजी