शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चकमकफेम दया नायक यांची एटीएसमध्ये बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:39 IST

प्रशासकीय करणास्तव ही बदली करण्यात आली

ठळक मुद्दे अंबोली पोलीस ठाण्यातून दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली आहे. नव्वदीच्या दशकातील ८३ गुंडांना यमसदनी धाडून गुन्हेगारी जगतात दया नाईक यांनी दबदबा निर्माण केला होता.

मुंबई - चकमकफेम दया नायक यांची काल मुंबई शहर येथील अंबोली पोलीस ठाण्यातून दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय करणास्तव ही बदली करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांच्या आदेशाची प्रत पोलीस निरीक्षक दया नायक यांना प्राप्त झाली आहे.  नव्वदीच्या दशकातील ८३ गुंडांना यमसदनी धाडून गुन्हेगारी जगतात दया नाईक यांनी दबदबा निर्माण केला होता. मात्र, कालांतराने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अडकून दया नाईक यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आले होते. १९९५  सालच्या तुकडीतील डॅशिंग व्यक्तिमत्व असलेल्या नायक यांनी अल्पावधीतच ‘चकमक’फेम अशी आपली ओळख निर्माण केली. मात्र, कर्नाटक येथे आपल्या आईच्या नावे बांधलेल्या शाळेचे २००६ मध्ये सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करणं त्यांच्या अंगाशी आलं. एका पोलीस अधिकाऱ्याकडे शाळा बांधण्यासाठी एवढे पैसे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा (एसीबी) ससेमिरा त्यांच्यामागे लागला. गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख बनविलेल्या नायक यांना बेहिशेबी मालमत्तेच्या वादाने नाउमेद झाले. या प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई होऊन मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. जामिनावर सुटल्यानंतर तर ते अज्ञातवासात गेले होते. अलीकडेच काही वर्षांपूर्वी ते पुन्हा पोलीस खात्यात रुजू झाले.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसMumbaiमुंबईTransferबदली