शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस रेल्वे भरतीप्रकरणी कर्मचारीही रडारवर; उमेदवारांचे भुसावळ, चेन्नईमध्ये ट्रेनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 05:50 IST

एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. मूळचा साताऱ्याचा रहिवासी असलेला हरिश्चंद्र कदम याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे

मुंबई - मंत्रालयापाठोपाठ रेल्वेत १४ लाखांत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत मुंबईसह सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींची फसवणूक झाली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी रेल्वेचे जॉयनिंग लेटर, बनावट ऑर्डर कॉपी देत मुलाखतींबरोबर चेन्नईमध्ये एक महिन्याचे ट्रेनिंग करण्यास भाग पाडून तरुणांचा विश्वास संपादन केला होता. यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचाही काही हात आहे  का? या दिशेनेही पोलिस अधिक तपास करत आहे.

एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. मूळचा साताऱ्याचा रहिवासी असलेला हरिश्चंद्र कदम याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. रेल्वेतून मेल आल्याचे भासवून बनावट ऑर्डर देऊन, त्यावर बनावट सही  करून बनावट शिक्क्यांच्या वापर करून ती ऑर्डर खरी असल्याचे भासवून उमेदवारांना देण्यात आल्या. त्यानुसार, सुरुवातीला भुसावळ ट्रेनिंग सेंटर गाठले. मात्र, तेथे गेल्यानंतर ऑर्डर कॉपी बनावट असल्याचे समजताच तरुणांना धक्का बसला. याबाबत नोकरीची माहिती देत पैसे घेणाऱ्या शिवाजी नामदेव घनगेसोबत संवाद साधल्यानंतर त्यानेही तेथे धाव घेतली. तरुणाला बाहेर थांबवून तो आतमध्ये गेला. त्यानंतर, जवळच्या रुग्णालयात मेडिकल टेस्ट पूर्ण केली. काही दिवसांनी ऑर्डर चुकीची काढल्यामुळे नव्याने ऑर्डर काढणार असल्याचे सांगितले.

खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंगआरोपींनी १३ जणांची यादी देत त्यांना चेन्नईला पाठवले. त्या यादीत घनगे यांच्या मुलीचेही नाव होते. तेथे गेल्यानंतर एका रेल्वेचे ट्रेनिंग सेंटर सांगून एका खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये एक महिना ट्रेनिंग पूर्ण करण्यास भाग पाडल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. यामध्ये फसवणूक झालेल्या उमेदवारांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग?या रॅकेटमध्ये रेल्वेसह कुठल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा हात आहे का?  याबाबतही पोलिस अधिक तपास करत आहे. 

 

टॅग्स :railway recruitmentरेल्वेभरती