शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातीस पाठविलेल्या मण्यांसह कारपेटचा अपहार; ३० सप्टेबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 01:13 IST

मुंबईतील एका ट्रान्सपोर्टचा ट्रक घेऊन मेहफूज कुरेशी हा चालक उत्तर प्रदेशातून मुंबईत येण्यासाठी १६ जून रोजी निघाला होता. मात्र, हा ट्रक रिकामा येण्याऐवजी त्यात काही सामान घेऊन येतो, असे त्याने ट्रान्सपोर्टचे मालक त्रिपाठी यांना सांगितले.

ठाणे : उत्तर प्रदेशातून थेट जपानमध्ये नेण्यात येणारे कारपेट, तसेच किमती मणी असलेल्या ५५ लाखांच्या मालाचा परस्पर अपहार करणारा चालक मेहफूज कुरेशी (२१), त्याचे साथीदार जफरुल ऊर्फ जाफर कुरेशी (३५) आणि अजिज मलिक (३०, राहणार तिघेही उत्तर प्रदेश) या तिघांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर मध्यवर्ती कारागृहातून नुकतेच ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे १० लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.मुंबईतील एका ट्रान्सपोर्टचा ट्रक घेऊन मेहफूज कुरेशी हा चालक उत्तर प्रदेशातून मुंबईत येण्यासाठी १६ जून रोजी निघाला होता. मात्र, हा ट्रक रिकामा येण्याऐवजी त्यात काही सामान घेऊन येतो, असे त्याने ट्रान्सपोर्टचे मालक त्रिपाठी यांना सांगितले. त्यांनी परवानगी देताच उत्तर प्रदेशातील संदीप पांडे यांचे जपान येथे निर्यात होणारे मणी आणि कारपेट असा ५५ लाखांचा माल त्याने जेएनपीटी बंदरामध्ये नेण्यासाठी ट्रकमध्ये भरला. मात्र, तो वाटेतच शहापूर भागात परस्पर रिकामा करून कुरेशी त्याच्या साथीदारांसह पसार झाला होता. रिकामा ट्रक मिळाल्यानंतर पांडे यांनी या प्रकरणी २७ जून रोजी शहापूर पोलीस ठाण्यात अपहाराची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, नागपुरातील पारधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ३५ लाखांच्या चहाच्या अपहाराच्या अशाच गुन्ह्यात कुरेशीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्या आधारे नागपूर न्यायालयामार्फत नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ८ सप्टेंबर रोजी या तिघांचाही ताबा घेतला. त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत शहापूर न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली.३० सप्टेबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमेहफूज अशाच प्रकारे ट्रान्सपोर्टचा माल चोरायचा. तर जाफर आणि अजिज हे दोघेही त्यासाठी गिºहाईक शोधायचे. त्याच्या विक्रीनंतरही हे तिघे आणि त्यांचे दोन साथीदार आपसात पैसे वाटून घेणार होते.दोन साथीदारांचा व उर्वरित मालाचा शोध घेण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी मेहफूज कुरेशीसह तिघांनाही ३० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शहापूर न्यायालयाने दिले. त्यामुळे १८ सप्टेंबर रोजी त्यांची रवानगी पुन्हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी