शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

एल्विशच्या पार्टीत नेमकं काय-काय व्हायचं? 'ती' डायरी सगळं गुढ उकलणार, अडचणी वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 13:51 IST

बिग बॉस ओटीटी सीझन-२ चा विजेता एल्विश यादव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्टीचा आरोप एल्विश यादववर आहे.

नवी दिल्ली-

बिग बॉस ओटीटी सीझन-२ चा विजेता एल्विश यादव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्टीचा आरोप एल्विश यादववर आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानं चौकशीवेळी हरियाणवी गायिका फाजिलपुरिया हिचं नाव घेतलं होतं. आता याप्रकरणात दररोज नवे अपडेट्स समोर येत आहेत. विषारी सापांच्या तस्करीच्याबाबतीत पोलिसांना आता काही धागेदोरे हाती लागले आहेत. 

नोएडा पोलिसांना याप्रकरणात चौकशी करत असताना मुख्य आरोपी राहुल याची डायरी मिळाली आहे. या डायरीतून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. राहुलच्या डायरीत पार्टीच्या आयोजकांची नाव नमूद असल्याची माहिती समोर आली आहे. नोएडा पोलिसांची दोन पथकं राहुल याची चौकशी करत आहेत आणि त्याच्या डायरीचाही तपास केला जात आहे. एक पथक डायरीतील नमूद नावांशी संपर्क करत आहे. तर दुसरं पथक डायरीत नमूद असलेल्या ठिकाणांना भेट देऊन पुरावे एकत्र करण्याचं काम करत आहे. 

राहुलच्या डायरीतून होणार मोठे खुलासेसुत्रांच्या माहितीनुसार, डायरीमध्ये अनेकांच्या नावांचा उल्लेख आहे. यात गुरुग्राममध्ये झालेल्या एका पार्टीचाही उल्लेख आहे. पार्टीत नेमकं काय-काय झालं होतं याची माहिती पोलीस घेत आहेत. तसंच पार्टीचे व्हिडिओ मिळवण्यासाठीही पोलीस प्रयत्न करत आहेत. राहुल आणि एल्विश यांच्या नेमका काय संवाद झाला होता? याचाही पोलीस तपास करत आहेत. राहुल याप्रकरणाचा प्रमुख आरोपी आहे. हा तोच व्यक्ती आहे ज्याचं रेकॉर्डिंग समोर आलं होतं. ज्यात राहुलनं एल्विश यादव याला ओळखत असल्याची कबुली दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार राहुल आणि एल्विश यादव यांची समोरा-समोर चौकशी केली जाणार आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?नोएडा पोलिसांनी सेक्टर-४९ मध्ये टाकलेल्या एका धाडीत विषारी साप आणि त्यांचं विष जप्त केलं होतं. पोलिसांना राहुल याच्याकडे 20ml विष सापडलं होतं. त्यानंतर रेव्ह पार्टीत सापांचं विष नशेसाठी वापरलं जात असल्याचं निष्पन्न झालं आणि याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणात यूट्यूबर एल्विश यादवचंही नाव पुढे आलं आहे. त्याच्यावर अवैधरित्या सापांच्या विषाची तस्करी केल्याचा आणि रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. सध्या सर्वजण पोलीस कोठडीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी