शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक देऊन २ वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला १६ वर्षांनी अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:32 IST

संजय असे या आरोपीचे नाव असून त्याने २००९ मध्ये २ वर्षांच्या मुलाची विजेचा शॉक देऊन हत्या केली होती. 

नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिसांनी १६ वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. संजय असे या आरोपीचे नाव असून त्याने २००९ मध्ये २ वर्षांच्या मुलाची विजेचा शॉक देऊन हत्या केली होती. 

आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी असून या घटनेनंतर तो नेपाळला पळून गेला होता. आता त्याला नोएडामधील सेक्टर ६२ मधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर २००९ मध्ये आरोपीने एका घरात घुसून एका निष्पाप मुलाला विजेचा शॉक देऊन तिची हत्या केली होती. याबाबत मृत मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी मृताच्या घरी इलेक्ट्रिशियन म्हणून जात असे आणि नोएडाच्या सेक्टर 58 मधील मामुरा येथे काम करत असे. हत्येच्या दिवशी मुलाचे आई-वडील घरी नसताना आरोपी घरात घुसला आणि त्याने मुलाची हत्या केली. या हत्येनंतर आरोपी संजय नेपाळला पळून गेला आणि तेव्हापासून तो फरार होता. नोएडा पोलीस त्याचा सतत शोध घेत होते आणि अखेर त्याला नोएडामधील सेक्टर ६२ मधून अटक करण्यात आली. डीसीपी सुमित कुमार शुक्ला म्हणाले की, आरोपीला अटक केल्यानंतर आता पोलीस मृताच्या कुटुंबाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. ही अटक पोलिसांसाठी एक मोठे यश मानले जात आहे, कारण आरोपी इतक्या वर्षांपासून फरार होता. दरम्यान, या प्रकरणी नोएडा पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी २५ हजार रुपयांचे बक्षीसही ठेवले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी