शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसमोरच शिवसैनिकांची वयोवृद्ध नागरिकाला मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

By प्रविण मरगळे | Updated: February 7, 2021 12:43 IST

याठिकाणी पोलिसांसमोर कार्यकर्त्यांनी शिरीष काटेकर यांना मारहाण केल्याचं दृश्यांमधून दिसत आहे

ठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वी कांदिवली येथे शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होतीहा व्हिडीओ पंढरपूरातील असून उद्धव ठाकरेंबद्दल खालच्या शब्दात टीका केल्याने मारहाण केल्याचं म्हणणंकार्यकर्त्यांकडून शिवसेना झिंदाबादच्या घोषणा, पोलिसासमोर मारहाण करण्याचा प्रयत्न

पंढरपूर – शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका वयोवृद्ध नागरिकाला बेदम मारहाण करत त्यांच्या तोंडावर काळं फासल्याची घटना घडली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशांत जगताप नावाच्या कार्यकर्त्याने हा व्हिडीओ ६ फेब्रुवारी रोजी ट्विटरवर अपलोड केला आहे. त्याने प्रोफाईलमध्ये आपली ओळख शिवसैनिक अशी केली असून युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्यासोबतचा फोटो डीपीला ठेवला आहे.

या व्हिडिओत असं दिसून येत आहे की, काही कार्यकर्ते एका व्यक्तीला घेरून त्याला पकडून घेऊन जात आहेत, या व्यक्तीच्या चेहऱ्याला काळा बुक्का फासण्यात आला आहे, यांचं नाव शिरीष काटेकर असल्याचं बोललं जात आहे. काटेकर हे भाजपा आणि आरएसएसचे स्वयंसेवक असल्याचं सांगितले गेले आहे. काटेकर यांना बांगड्याचा हार आणि साडी देण्यात आली, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

याठिकाणी पोलिसांसमोर कार्यकर्त्यांनी शिरीष काटेकर यांना मारहाण केल्याचं दृश्यांमधून दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीवर टीका केल्याने शिवसेनेच्या पंढरपूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी ही मारहाण केल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंविरोधात बोलतो असं म्हणत कार्यकर्त्यांनी शिवसेना स्टाईलने चोप दिल्याचं प्रशांत जगताप या युजर्सने ट्विटरमध्ये लिहिलं आहे.  इतकचं नाही तर याला नॉर्मल चोप दिला असून १५-२० हाडं मोडली असल्याची माहिती आहे, ६ महिनेतरी आयसीयूत ठेवावे लागेल असं या शिवसैनिकाने ट्विटरमध्ये म्हटलं आहे. याबाबत अद्याप शिवसेनेची प्रतिक्रिया मिळाली नाही. 

शिवसैनिकांनी केली होती निवृत्त नौदल कर्मचाऱ्याला मारहाण

काही महिन्यांपूर्वी कांदिवली येथे शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती, हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं होतं, संरक्षण मंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत या प्रकरणावर सगळ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात सोशल मीडियात पोस्ट केली होती, याचाच राग मनात ठेऊन काही शिवसैनिकांनी या कर्मचाऱ्याला घरातून उचलून बाहेर आणत मारहाण केली होती, ही घटना सीसीटीव्ही कैद झाली होती, यामुळे शिवसेना अडचणी सापडली होती.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliceपोलिसBJPभाजपा