शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकता भाटी यांच्या खुनाची सुपारी देणाऱ्या  महिलेला दिल्लीत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 23:04 IST

वडगाव शेरी येथील एकता भाटी या महिलेच्या खुनाची सुपारी देणा-या महिलेला पुणे पोलिसांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी दिल्लीतून ताब्यात घेतले

पुणे : वडगाव शेरी येथील एकता भाटी या महिलेच्या खुनाची सुपारी देणा-या महिलेला पुणे पोलिसांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी दिल्लीतून ताब्यात घेतले असून तिला अटक करण्यात आली आहे.संध्या पुरी (रा. दिल्ली) असे तिचे नाव आहे.एकता भाटी यांचे पती ब्रिजेश भाटी यांच्याशी संध्या पुरी यांचा आर्थिक व्यवहारावरुन वाद होता़ अनेकांचे पैसे द्यायचे असल्याने ब्रिजेश भाटी सुमारे अडीच वर्षापूर्वी दिल्लीहून पुण्यात कुटुंबासह रहायला आला़ त्यानंतर या महिलेने त्याचा शोध घेतला. पुण्यात येऊन पुरी याने भाटी याची भेट घेतली होती़  गेल्या तीन ते चार वर्षापासून ब्रिजेशचे तिच्याबरोबर संबंध होते़ ब्रिजेशने तिच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसेही घेतले होते़ दुसरीकडे तो तिच्याशी लग्न ही करत नव्हता आणि पैसेही देत नव्हता़ त्यामुळे तिने दिल्लीत त्याच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली होती़ याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भाटीयाला अटकही केली होती. तो सुमारे दीड महिने कोठडीत होता. पुरी त्याच्याकडे सतत पैशाची मागणी करीत असे़ पैसे दिले नाही तर तुझे खानदान संपवून टाकेन, अशी धमकीही ती देत होती़ तो आपल्याला मिळावा व आपल्या तरी काटा दूर व्हावा, यासाठी तिने शिवलाल व मुकेश राव या पिता पुत्रांना ब्रिजेशची पत्नी एकता हिच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यानंतर शिवलाल व मुकेश राव यांनी बुधवारी २१ नोव्हेंबरला सकाळी पावणेआठ वाजता त्यांन घरात शिरुन एकता वर गोळीबार करुन तिचा खुन केला़ त्यानंतर ते पळून गेले होते. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे पथक पुणे रेल्वे स्टेशनवर तपासणी करत होते़ त्यावेळी शिवलाल याने पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी केले होते़ पळून जाणाºया दोघा पिता पुत्रांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे तपास केल्यावर पुरी हिने त्यांना सुपारी दिल्याचे उघड झाले. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाची टीम तातडीने दिल्लीला रवाना झाली होती. या पथकाने तिचा शोध घेऊन तिला सोमवारी रात्री पुण्यात आणले. पुरी हिला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी