शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

एजाज लकडावालाने मुंबई पोलिसांना सांगितला दाऊदचा ठावठिकाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 20:12 IST

एजाजविरुद्ध मुंबईत खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न आदी २५ गुन्हे नोंद असून ८०हून अधिक तक्रारी आहेत.

मुंबई : गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बुधवारी बिहारमध्ये अटक केली. एजाजची अटकेतील मुलगी शिफा हिच्या चौकशीतून तो येणार असल्याची माहिती मिळताच ही कारवाई झाली. मात्र, एजाजच्या जिवाला ऑर्थर रोड तुरुंगात धोका असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला आहे. चौकशीवेळी एजाजने दाऊदचा ठावठिकाणा पोलिसांना सांगितला आहे. 

दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एजाजने नंतर छोटा राजनच्या मदतीने टोळी तयार केली. राजनसह त्याने मलेशिया, केनिया, कॅनडा, स्वीत्झर्लंड व अरब देशांत प्रस्थ निर्माण केले. राजन व एजाजवर २००२ मध्ये बँकॉकमध्ये छोटा शकीलच्या हस्तकांनी गोळ्या झाडल्या होत्या. यात एजाज जखमी झाला होता. एजाज १९९२ ते २००८ पर्यंत छोटा राजन टोळीत होता. टोळीत आर्थिक खटके उडायला सुरुवात झाली. त्यामुळे एजाजने स्वत:ची टोळी सुरू केली.

एजाजविरुद्ध मुंबईत खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न आदी २५ गुन्हे नोंद असून ८०हून अधिक तक्रारी आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून लकडावाला खंडणीसाठी फोन करून धमकावत असे. सहा महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्या मुलीला २७ डिसेंबर रोजी अटक झाली. बनावट पासपोर्टच्या आधारे ती नेपाळला पळून जात होती. एजाजला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बिहार पोलिसांच्या मदतीने अटक केली. तो बनावट पासपोर्टच्या आधारे बिहारमध्ये आला होता. 

दरम्यान, चौकशीवेळी दाऊद आजही कराचीत राहत असल्याची माहिती एजाजने मुंबई पोलिसांना दिली आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. 

परदेशात मोठी संपत्तीलकडावाला याचे कॅनडा, युनायटेड किंग्डम, अमेरिका, मलेशिया, कंबोडिया, नेपाळ या देशांत वास्तव्य असून, यापैकी त्याची कॅनडा, मलेशिया व लंडनमध्ये संपत्ती असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. एजाजकडे दाऊदसंदर्भात बरीचशी माहिती असल्याच्या शक्यतेतून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या मुंबई व अन्य ठिकाणच्या साथीदारांचाही शोध सुरू आहे. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमMumbai policeमुंबई पोलीसPakistanपाकिस्तान