शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात आठ शिक्षकांची केली हत्या; दोन पंथांतील वैमनस्यातून घडला प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 10:13 IST

ही आदिवासी जमात सुन्नीपंथीय आहे. तसेच दुसऱ्या घटनेत शियापंथीय असलेल्या टोरी आदिवासी जमातीतील सात शिक्षकांची हत्या झाली.  

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात दोन स्वतंत्र घटनांमध्ये मिळून आठ शिक्षकांची हल्लेखोरांनी हत्या केली आहे. हा भाग अफगाणिस्तानच्या सीमेलगत आहे. दोन पंथांमधील वैमनस्यातून या हत्या झाल्या असाव्यात असा पोलिसांचा कयास आहे. 

खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अप्पर खुर्राम आदिवासी जिल्ह्यातील शालोझान मार्गावर मुहम्मद शरीफ या तेरी मेंगल आदिवासी जमातीतील शालेय शिक्षकाची हत्या करण्यात आली. ही आदिवासी जमात सुन्नीपंथीय आहे. तसेच दुसऱ्या घटनेत शियापंथीय असलेल्या टोरी आदिवासी जमातीतील सात शिक्षकांची हत्या झाली.  

कोहात शिक्षण मंडळ घेत असलेली ९वी, १०वीची परीक्षा शिक्षकांच्या हत्येनंतर पुढे ढकलण्यात आली आहे. हल्लेखोरांना अटक होत नाही तोवर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ऑल खुर्राम टीचर्स असोसिएशनने घेतला आहे. 

सिंध प्रांतात ५० हिंदूंचे धर्मांतरपाकिस्तानातील सिंध प्रांतात दहा हिंदू कुटुंबांतील ५० जणांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याची घटना घडली आहे. पाकिस्तान सरकारच्या आशीर्वादाने हे सामूहिक धर्मांतर पार पडल्याचा आरोप तेथील हिंदू नेत्यांनी केला आहे. मीरपूरखास भागात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांचे धर्मांतर करण्यात आले. त्यामध्ये २३ महिला व एक वर्षे वयाच्या बालिकेचाही समावेश आहे. या धर्मांतरासाठी खास सोहळाही आयोजिण्यात आला होता.  

हिंदू युवकाच्या हत्येबद्दल गुन्हा पाकिस्तानमधील सिंध प्रांतात कमल किशन या हिंदू युवकाच्या हत्येप्रकरणी पोलिस अधिकारी फर्मान शहा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. १ मे रोजी कमल किशनची फर्मान याने गोळ्या झाडून हत्या केली अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती.